google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

Manipur Violence : 4 ​​शस्त्रास्त्र तस्करांना अटक

मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी 4 तस्करांना अटक केली आहे. हे लोक पोलिसांकडून शस्त्रे चोरुन विकायचे. इम्फाळ पूर्वेचे पोलिस अधीक्षक शिवकांत सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

शिवकांत म्हणाले की, ‘आज सकाळी कैरांग अवांग लीका आणि खोमिडोकजवळ 4 तस्करांना पकडण्यात आले. चौकशी केली असता ते पोलिसांकडून चोरलेली शस्त्रे आणि दारुगोळा विकत असल्याचे उघड झाले. यादरम्यान एक 9 एमएम कार्बाइन, एक .22 पिस्तूल, दोन 5.56 एमएमची इनसास मॅगझिन, एक 303 एलएमजी मॅगझिन, 7.62 एमएम दारुगोळ्याचे 21 नंबर आणि रोख अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.’

नुकतेच मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी हिंसाचाराबद्दल सांगितले होते की, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमधील हिंसाचाराच्या बदलत्या स्वरुपावर चिंता व्यक्त केली आहे.’ वृत्तानुसार, इम्फाळ खोऱ्याच्या बाहेरील भागात झालेल्या हिंसाचारानंतर अमित शाह जिल्ह्यांमध्ये शांतता राखण्याचे नागरिकांना आवाहन करत आहेत. रविवारी उशिरा नवी दिल्लीहून परतल्यानंतर इम्फाळमध्ये पत्रकारांशी बोलताना सिंह म्हणाले की, “बाहेरील गोळीबारापासून ते खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये नागरी अशांततेपर्यंत, हिंसाचाराचे बदलते स्वरुप गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.”

मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक संघर्षात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी मैतई समुदायाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढण्यात आला. त्यानंतर हिंसक संघर्षला सुरुवात झाली. मणिपूरमधील लोकसंख्येपैकी मैतई समुदायाचा वाटा सुमारे 53 टक्के आहे, बहुतेक लोक इम्फाळ खोऱ्यात राहतात. तर नागा आणि कुकी समुदयाची लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे. हे लोक बहुतांश पर्वतीय जिल्ह्यांमध्ये राहतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!