google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीदेश/जग

WhatsApp आणणार AI फिचर


ओपनएआय कंपनीने गेल्या वर्षी आपला ChatGpt हा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. त्यापाठोपाठ मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांनीदेखील आपले चॅटबॉट सादर केले आहेत. सध्या अनेक कंपन्या त्यावर काम करत आहेत. अनेक ठिकाणी AI चा वापर सुरु करण्यात आला आहे. यात आता मेटाचा देखील समावेश होणार आहे. कारण आता व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते लवकरच AI चा वापर करून थेट चॅटमधेय कस्टमाइज स्टिकर्स तयार करू शकणार आहेत. जनरेटिव्ह AI अनेक लोकप्रिय प्लॅटफॉर्ममध्ये आपली जागा तयार करत आहे.

WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन AI स्टिकर टूल लवकरच वापरकर्त्यांसाठी उपलध केले जाईल. कारण काही अँड्रॉइड बीटा वापरकर्ते नवीवनं अपडेटनंतर हे फिचर शोधण्यात सक्षम झाले आहेत. एकदा का नवीन फिचर रोलआऊट झाले की, व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना स्टिकर टॅबमध्ये कीबोर्ड उघडताना एक नवीन ‘क्रिएट’ बटण दिसेल. जेव्हा वापरकर्ते हे बटण सिलेक्ट करतील तेव्हा त्यांना एक वर्णन ऍड करावे लागेल जे स्टिकर तयार करण्यासाठी वापरले जाईल. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, AI स्टिकर मेटाद्वारे ऑफर केलेल्या सुरक्षित टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केले जातात.” जर वापरकर्त्यांना जर वापरकर्त्यांना असे वाटत असेल की स्टिकर अयोग्य किंवा हानिकारक आहे, तर ते मेटाकडे त्याची तक्रार देखील करू शकतात. हे फिचर वापरकर्त्यांसाठी उपयोगी ठरू शकते कारण वापरकर्ते वैयक्तिकृत आणि त्यांच्या आवडी, अनुभव किंवा संभाषणांशी संबंधित असलेले स्टिकर्स तयार करू शकतील.

नुकतेच WhatsApp ने एक नवीन फिचर आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना ग्रुप कॉल शेड्युल करण्यास मदत करणार आहे. हे फिचर वापरकर्त्यांना अपकमिंग ग्रुप कॉल इव्हेंटबद्दल सर्व मेंबर्सना अलर्ट करण्यास सक्षम करते.व्हॉट्सअ‍ॅप डेव्हलपमेंटवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo प्लॅटफॉर्मने शेअर केलेल्या माहितीनुसार, हे फिचर मागील घोषणेदरम्यान डेव्हल्पमेंटमध्ये होते. तथापि, अँड्रॉइड व्हर्जन 2.23.17.7 साठी नवीन व्हॉट्सअ‍ॅप बीटा जे आता गुगल प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!