अर्थमत/ टेक्नॉलॉजी

तंत्रज्ञान-परंपरेचा संगम; गोदरेजच्या हातमाग स्नेही वॉशिंग मशीनला प्रतिसाद

गोदरेज एन्टरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस या विभागाने देशाच्या समृद्ध आणि कालातीत हातमाग परंपरेला पुन्हा उजाळा देण्यासाठी टेस्टेड फॉर हँण्डलूम्स या उपक्रमाच्या माध्यमातून एक अर्थपूर्ण पाऊल उचलले आहे. हातमागांसाठी अनुकूल अशा फ्रंट-लोड वॉशिंग मशीन तंत्रज्ञानाच्या मदतीने गोदरेजने हातमाग कापडांची निगा राखणे अधिक सोप्पे केले आहे. भारतीयांनी आपल्या पारंपरिक हातमाग कापडांचा अभिमानाने वापर करावा, त्यांना परिधान करावे तसेच या पारंपरिक वारशाचा उत्सव साजरा करावा, यासाठी हा उपक्रम प्रेरणा देत आहे.

देशातील प्रत्येक राज्याला स्वतःचा असा वैशिष्ट्यपूर्ण हातमाग वारसा आहे. केरळची कासावू, कर्नाटकमधील मैसूर सिल्रक, तेलंगणाची पोचंपल्ली इकत, महाराष्ट्राची पैठणी, लखनऊची चिकनकरी, गुजरात आणि राजस्थानमधील बांधणी आणि आसामचे मुगा सिल्क यांसारख्या अनेक कलांचा यात समावेश असून, त्यांपैकी काही निवडक कलांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यताही दिली आहे. शतकानुशतके चालत आलेल्या या विणकाम परंपरा भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. मात्र आजही हातमाग क्षेत्राला पुनरुज्जीवनाची तातडीची गरज आहे. ग्राहकांनी हातमाग कापडाचा अधिक प्रमाणात स्विकार करणे, त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. कापड खराब होण्याच्या भीतीमुळे बहुतांश लोक हातमाग वस्त्रांसाठी फक्त हाताने हातमागाचे कापड धुण्यावर किंवा ड्रायक्लिनिंगवरच अवलंबून राहतात, त्यामुळे अशा कापडांचा वापर आणि खरेदी दोन्ही कमी प्रमाणात होताना दिसून येते.

हातमागांच्या वस्त्रांच्या देखभालीची चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांची दैनंदिन निगा राखणे सोप्पे व्हावे, या उद्देशाने गोदरेजने आपल्या एआय तंत्रज्ञानावर आधारित प्रगत फ्रंट लोड वॉशिंग मशीन्सची यशस्वी चाचणी केली आहे. बनारसी सिल्क आणि पटोला सिल्कपासून ते पोचंपल्ली इकत आणि जामदानीपर्यंत भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील २५ विविध प्रकारच्या हातमाग कपड्यांवर ही यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या मशीनमधील जेंटल वॉश या प्रोग्रामच्या मदतीने हातमागाचे नाजूक कापड २५ वेळा धुतल्यानंतरही पूर्णपणे सुरक्षित राहते. या चाचणीदरम्यान कपड्याच्या बाह्य तपासणीसह विणकामाची मजबूतीही तपासण्यात आली. यासाठी ४० एक्स मॅग्निफिकेशन असलेल्या सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे परिक्षण करण्यात आले. यामुळे कापडाची गुणवत्ता तसेच धागेही खराब होत नसल्याचे सिद्ध झाले.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्ल्यान्सेस विभागाचे हेड कमल नंदी म्हणाले, ‘‘जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आपल्या परंपरांशी एकरुप होते, तेव्हाच आपण या अर्थाने मौल्यवान वारसा जपू शकतो. पुढील पिढ्यांसाठी प्रगतीचा मार्ग तयार करु शकतो. भारतीय हातमाग उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. डिझाइन्ड फॉर इंडिया या संकल्पनेवर आधारित आमच्या वॉशिंग मशीनद्वारे आम्ही भारतीयांना त्यांच्या सुंदर हातमाग कापडांचा अधिकाधिक वापर करण्यास, हे आत्मविश्वासाने आणि अभिमानाने परिधान प्रदर्शित करण्यास प्रोत्साहन देत आहोत.’’

याबाबत अधिक माहिती देताना गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपच्या अप्लायन्सेस व्यवसायाच्या मार्केटिंग प्रमुख स्वाती राठी म्हणाल्या, ‘‘गोदरेज एंटरप्रायझेसमध्ये आम्ही नेहमीच भारतासाठी खास तयार केलेल्या तंत्रज्ञानासाठी कटिबद्ध आहोत. टेस्टेड फॉर हँडलूम्स या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही भारतीय ग्राहकांना त्यांच्या घरातच गोदरेज वॉशिंग मशीनद्वारे हातमाग कापडांची काळजी घेणे अधिक सोप्पे करत आहोत. ’’

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!