गोवा

गोवा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सुनील कवठणकर

पणजी : अखिल भारतीय काँग्रेस समितीने गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या  कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांची तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे.


एआयसीसीचे सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांनी रविवारी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला.


सुनील कवठणकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ व सक्रिय नेते असून, त्यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तळागाळात सातत्याने काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गोव्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढण्यास, पक्षातील समन्वय अधिक प्रभावी होण्यास तसेच जनसंपर्क मोहिमेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, गोवा प्रदेश काँग्रेस समितीने पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे स्वागत केले असून, कवठणकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटना अधिक मजबूत होईल आणि गोवा तसेच राज्यातील जनतेच्या हितासाठी काँग्रेसची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!