![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/05/New-Project-2022-05-20T174824.126-780x470.jpg)
समुद्रातून जप्त केले तब्बल १५२६ कोटींचे हेरॉईन
नवी दिल्ली :
डायरेक्टोरेट रेवेन्यू इंटेलीजेंस ( DRI) आणि कोस्ट गार्डने (Indian Coast Guard) लक्षद्वीपच्या (Lakshadweep) समुद्रात सर्वात मोठं ऑपरेशन यशस्वी करून दाखवलं.
या संयुक्त ऑपरेशनमध्ये दोन बोटींसह 218 किलो हेरोईन ड्रग्स जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत (Crime News) तब्बल 1526 कोटी आहे. बोटींमध्ये काम करणारे, आणि त्यातील प्रवाशांची DRI आणि कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. डीआरआय आणि कोस्ट गार्डला एक गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार, तामिलनाडू आणि लक्षद्वीपच्या समुद्रात ड्रग्सची एक मोठी खेप येणार आहे. या माहितीच्या आधारावर, डीआरआय आणि कोस्ट गार्ड गेल्या 12 दिवसांपासून समुद्रात येणाऱ्या प्रत्येक बोटीवर लक्ष ठेवून होते. 18 मे रोजी डीआरआय आणि कोस्ट गार्डला लक्षद्वीपच्या समुद्रात दोन हिरव्या रंगाच्या संशयास्पद बोटी दिसल्या. जेव्हा कोस्ट गार्ड आणि डीआरआयने बोटीचा तपास केला तर त्याच्या खालच्या भागात पांढऱ्या रंगाच्या गोण्या ठेवल्या होत्या.
तपासानंतर कळालं की, दोन्ही बोटीत एकूण 216 किलो हाय क्वालिटीच्या हेरोइन आहेत. याची बाजारातील किंमत तब्बल 1526 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोस्ट गार्डने ऑपरेशन सुरू केलं आहे. केंद्रीय तपास एजन्सींसोबत ऑपरेशन… या ऑपरेशनमध्ये कोस्ट गार्ड दुसऱ्या केंद्रीय तपास एजन्सीसोबत मिळून समुद्राच्या रस्त्यातून जाणाऱ्या ड्रग्सची खेप आणि स्मगलिंगवर नजर ठेवून होते. या ऑपरेशनपूर्वीही कोस्ट गार्डने डीआरआयसोबत मिळून कोटींची ड्रग्स पकडली आहे.