गोवा

म्हार्दोळच्या साई म्हाळसा आरती मंडळाला प्रथम क्रमांक

अखिल गोवा घुमट आरती स्पर्धा उत्साहात

कुडचडे : अमित पाटकर यांच्या आयोजनाखाली घेण्यात आलेल्या अखिल गोवा घुमट आरती स्पर्धा २०२६ मध्ये राज्यभरातील आरती मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक घुमट आरतीच्या माध्यमातून गोव्याच्या सांस्कृतिक आणि भक्तिपरंपरेचे दर्शन या स्पर्धेत घडले.

स्पर्धेत म्हार्दोळ (फोंडा) येथील श्री साई म्हाळसा आरती मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. बोरी (फोंडा) येथील श्री नवसाई आरती मंडळाला द्वितीय, तर कुर्टी (फोंडा) येथील श्री केळबाई सातेरी मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला.

उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये कुडचडे येथील श्री बाल मारुती सातेरी आरती मंडळाला प्रथम, तर बांदोडा येथील श्री महालक्ष्मी आरती मंडळाला द्वितीय पारितोषिक देण्यात आले.

विशेष पारितोषिकांमध्ये ‘बेस्ट कासाळे’ पुरस्कार श्री मल्लिकार्जुन आरती मंडळ, श्रीस्थळ (काणकोण) येथील स्वप्नील नाईक यांना, तर ‘बेस्ट शामेळ’ पुरस्कार कुडचडे येथील श्री नागनाथ बेताळ आरती मंडळाचे सर्वेश नाईक यांना मिळाला.

बेस्ट घुमट ग्रुपचा पुरस्कार श्री साई म्हाळसा आरती मंडळ, म्हार्दोळ यांना, तर बेस्ट सिंगर पुरस्कार कुडचडे येथील श्री बाल मारुती आरती मंडळाचे अपुर्वा देसाई यांना जाहीर करण्यात आला.म्हार्दोळ

दरम्यान, स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कुडचडे येथील अमित पाटकर मैदानावर आयोजित चतुर्थी महोत्सव २०२६मध्ये होणार आहे.

गोव्याची पारंपरिक घुमट आरतीची कला जपण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांची गरज असल्याचे अमित पाटकर यांनी सांगितले. नव्या पिढीपर्यंत गोव्याची पारंपरिक कला पोहोचविण्यासाठीही अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!