गोवा

चार वर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयिताला अटक

म्हापसा : दिवाळीच्या दिवशी अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात म्हापसा पोलिसांनी (Mapusa Police)  संशयित पुंडलिक गुडगे (रा. धारवाड, कर्नाटक) या संशयिताला पणजी येथून अटक केली आहे.

चार वर्षांच्या बालिकेवरील अत्याचाराच्या या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हापसा पोलिसांनी तपासाची चक्रे  फिरवत संशयिताचा शोध घेतला आणि त्याला पणजीतून ताब्यात घेतले. राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा केला जात असताना चार वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचाराची घटना घडली होती.

आपल्या वडिलांबरोबर फुगे विकण्यासाठी ही मुलगी बाजारात आली होती. वडील दारूच्या नशेत रस्त्याच्या बाजूला झोपले होते तर चिमुकली त्याच्या बाजूला बसून रडत होती. या संधीचा फायदा घेऊन या निष्पाप बालिकेला एका सुनसान इमारतीत नेऊन हे कुकृत्य करण्यात आले होते. त्यानंतर मुलगी रडत रस्त्यावर आल्यावर या एकूण प्रकरणाचा उलगडा झाला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला गजाआड करून जलद खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!