google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘हिमाचलच्या राज्यपालांनी द्यावा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘हा’ सल्ला’

पणजी:

गोव्यातील भाजप सरकारने राज्याला दिवाळखोर केले आहे. हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आमदारांना भाजपचा उदोउदो करणाऱ्या संस्थेकडुन प्रशिक्षण घेण्याचा सल्ला देण्याऐवजी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंताना खर्च कपात व लोकशाही मुल्यांचे जतन करण्यावर प्रशिक्षण घेण्याचा सल्ला देणे गरजेचे होते असे कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसचे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी सर्वप्रथम गोवा विधीमंडळ सचिवालयाने एका पंचतारांकीत हॉटेलात, भाजप व संघाचा उदोउदो करणाऱ्या एका संस्थेमार्फत दोन दिवशीय आमदार प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यास जाहिर विरोध केला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरतात असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगीतले.

हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना एका पंचतारांकीत हॉटेलात लाखो रुपयांची उढळपट्टी करुन जेमतेम दहा आमदारांनी हजेरी लावलेले प्रशिक्षण शिबीर का घेतले यावर प्रश्न विचारणे जमले नाही. ते गोवा विधानसभेचे सभापती होते व विधानसभा संकुलातील सर्व सोयी-सुविधांची जाण त्यांना आहे. त्यामुळे त्यांची दुट्टपी भूमिका स्पष्ट होते असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

निवडणुकीपुर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व सभापती प्रतापसिंग राणे यांचे नाव भाजपने राजकीय फायद्यासाठी वापरले, परंतु दोन दिवसांच्या आमदार प्रशिक्षण शिबीराला त्यांना मार्गदर्शक म्हणुन निमंत्रीत करण्याचे टाळले. माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांचा अनुभव आमदारांना मदतरुप ठरला असता असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

भाजप सरकार आज करोडो रुपयांचा चुराडा करुन केवळ उत्सव व कार्यक्रम आयोजित करुन प्रधानमंत्री मोदी प्रमाणेच आपला उदोउदो करण्यात व्यस्थ असुन, राज्यात आज सामाजीक योजनांचे लाभार्थी, सामान्य जनता, हलाखीच्या स्थितीत जगणारे खेळाडू, कोविड मृतांचे नातेवाईक, शेतकरी हे सरकारच्या अर्थसहाय्याची वर्षानुवर्षे वाट पाहत आहेत. परंतु सरकारला जनतेचे काहिच पडलेले नाही अशी टिका अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!