करण सिंह ठोकणार कॉंग्रेसला रामराम?
नवी दिल्ली:
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला. आता जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो.
महाराजा हरिसिंह यांचे पुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री करण सिंह यांनीही काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. करण सिंह म्हणाले की, ‘1967 मध्ये मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, पण आज पक्षाशी असणारे माझे संबंध कमी झाले आहेत.’
करण सिंह पुढे म्हणाले, ‘1967 मध्ये मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण मागील 8 ते 10 वर्षे झाले मी संसद सदस्यही नाही. कॉंग्रेस कार्यकारिणीतून मलाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. होय, मी काँग्रेसमध्ये आहे, परंतु पक्षातील बड्या नेत्यांशी माझा संपर्क राहिलेला नाही. माझ्याशी कोणीही बोलत नाही.’