…आणि व्हॉट्सअॅप झालं डाऊन
नवी दिल्ली:
जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. आधी काही काळ व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले आहेत. आत्तापर्यंत हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं ट्विटरवर सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या अर्ध्या तासापासून व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅपकडून अद्याप अधिकृत माहिती दिली नसल्यामुळे हा बिघाड नेमका कधीपर्यंत दुरुस्त होईल? याबाबत नेटिझन्स ट्विटरवर विचारणा करू लागले आहेत.