बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
सातारा (महेश पवार) :
बेकायदेशीर रित्या शस्त्रे बाळगून त्याची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार सदस्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे . त्यांच्याकडून आठ काडतूस चार पिस्टल एक मॅक्झिन तीन मोबाईल, दोन मोटरसायकल असा चार लाख 18 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई शुक्रवारी दुपारी तीन वाजता पुणे बेंगलोर महामार्गावर शिवराज ढाबा व वाढे फाटा परिसरात करण्यात आले .
गणराज वसंत गायकवाड वय 20 राहणार काळे वस्ती दौंड जिल्हा पुणे, आदित्य तानाजी गायकवाड वय 20 राहणार वाठार किरोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा, वैभव बाळासो वाघमोडे वय 20 राहणार शैला भाभी दूध डेअरी जवळ बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली ,स्वप्नील संजय मदने व 29 राहणार गणेश चित्रमंदिर समोर रामानंदनगर किर्लोस्करवाडी तालुका पलूस जिल्हा सांगली अशी आरोपींची नावे असून त्यांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे
दिनांक 30 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की दोन्ही इसम यामाहा मोटरसायकल वरून शिवराय ढाबा परिसरात देशी बनावटीच्या पिस्टलच्या विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आणि विशेष पथका सूचना करून सक्रिय केले . त्याप्रमाणे तपास पथकाने शिवराज ढाबा परिसरात वर्णन केलेल्या प्रमाणे दोन इसमांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन पिस्टल, सहा काडतूस एक मोबाईल यामाहा गाडी असा दोन लाख 16 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्या आणखी दोन साथीदार वाढे फाटा येथे असून त्यांच्याकडे दोन पिस्तुल असल्याची माहिती तपास पथकास मिळाली संबंधित पथकाने वाढे फाटा येथे तातडीने छापा मारून दोन इसमांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन पिस्टल दोन काडतूस एक मॅक्झिन दोन मोबाईल स्प्लेंडर मोटरसायकल असा दोन लाख 2400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण चार इसमांकडून आठ काडतूस एक मॅक्झिन तीन मोबाईल हँडसेट दोन मोटरसायकल असा चार लाख 18 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पत्रकात नमूद आहे .नोव्हेंबर 2022 पासून आज पर्यंत जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस यांचे मार्फत 19 इसमांकडून बारा देशी बनावटीची पिस्तूल आणि बारा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे
या कारवाईमध्ये सपोनी संतोष तासगावकर, रमेश गरजे,अमित पाटील ,उत्तम दबडे ,आतिश घाडगे, संतोष पवार ,संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे ,मुनीर मुल्ला, गणेश कापरे ,निलेश काटकर ,शिवाजी भिसे, विशाल पवार ,रोहित निकम, केतन शिंदे ,सचिन ससाणे, मोहन पवार ,पृथ्वीराज जाधव यांनी कारवाईत भाग घेतला होता