‘खड्डे’ मुक्त नव्हे तर सातारा झाला ‘मुतारी’मुक्त…
सातारा (महेश पवार) :
सातारा म्हटलं की पहिला डोळ्यासमोर येतो अजिंक्यतारा आणि इथला इतिहास , अश्या ऐतिहासिक राजधानी म्हणजेच साताऱ्यात महिलांना पुरुषांसाठी चक्क मुतारी शोधून पण सापडत नाही खरंतर ती सापडायला ती असली तरी पाहिजे . अशी परिस्थिती आहे ऐतिहासिक राजधानी असलेल्या साताऱ्याची.
पुर्वी पासुन सातारा म्हटलं की वरचा रस्ता, खालचा रस्ता आणि मधला रस्ता एवढाच सातारा होता परंतु हळूहळू सातारचा विस्तार वाढला पण सोईसुविधा चा देखील वनवा भासू लागला आज सातारची ओळख जरी राजधानी असली तरी या राजधानीत राहणाऱ्या महिला पुरुष आणि वयोवृद्ध लोकांना शहरात मुतारी नसल्याने सातारा “खड्डे”मुक्त नव्हे तर “मुतारी”मुक्त झाला!!! सातारकरांना अशी म्हणायची वेळ आली.
गेली अनेक वर्षे सातारा पालिकेत दोन्ही राजेंची सत्ता होती तरीही सातारकरांना साधी मुतारी ची सोय करता आली यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही , यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत फक्त चर्चा एकाच गोष्टीची होणार ती म्हणजे सातारा “खड्डे”मुक्त नव्हे तर “मुतारी”मुक्त झाला!