‘माथाडी कामगारांना घरात बसवून परप्रांतीयांना कोण देतेय काम?’
सातारा (महेश पवार) :
सातारा एमआयडीसी मधील अल्ट्राटेक कंपनीच्या सिमेंट गोडाऊन मध्ये ठेकेदारामार्फत दहा ते पंधरा वर्षे पासून भरणी उतराई चे काम माथाडी कामगार करत आहेत .परंतु सदर आस्थापनेत भराई उतराईचे काम करण्यासाठी 50 ते 60 कामगार लागतात परंतु त्यापैकी बारा स्थानिक माथाडी कामगारांना कामावर ठेवले असून अन्य कामगार हे परप्रांतीय असून शासकीय आकडेवारीनुसार प्रति टन 70 रुपये असताना देखील त्यांच्याकडून पन्नास रुपये प्रति टन याप्रमाणे काम करून घेऊन प्रति टन 20 रुपये गाळा काढला जात असल्याची धक्कादायक बाब माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून समोर आली आहे .काही दिवसापूर्वी माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्या संदर्भात धरणे आंदोलन देखील केले होते.
सातारा एमआयडीसी मधील अल्ट्राटेक सिमेंट गोडाऊन मध्ये कामगार कायद्याचे उल्लंघन करून नोदींत स्थानिक कामगारांना कामापासून वंचित ठेवून पर राज्यातून आलेल्या कामगारांना कमी पैशात काम देऊन स्थानिक कामगारांना हाकलून दिले जात असल्याची माहिती समोर येत असून , संबंधित ठेकेदार बोगस कामगार दाखवून पैसे खात असल्याची परिसरातील कामगार वर्गात जोरदार चर्चा सुरू आहे . यामुळे सातारा एमआयडीसी मध्ये स्थानिकांच्या वर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कामगार आयुक्त काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या सर्व प्रकाराबाबत कंपनीचे ठेकेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.