‘आधी नुकसान भरपाई द्या, मग खुशाल रस्ता काढा…’
सातारा (महेश पवार) :
परळी भागातील कासरथळ येथील शेत जमिनीतून जेसीबीच्या साह्याने रस्ता काढत असताना शेतकरी असलेल्या वृद्ध महिलेने अटकाव केला. आधी नुकसान भरपाई द्या मग खुशाल रस्ता काढा, असे ठणकावताच कृष्णा खोरे विभागातील संबंधित अभियंता महिलेने तेथून पळ काढला.
अनिल पिंपळे हे नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. सोमवारी दुपारी जेसीबीसह फौजफाटा घेवून कृष्णा खोरे विभागातील महिला अधिकारी कासरथळ येथे रस्ता काढण्यासाठी पोहोचल्या. पिंपळे यांना कोणतीही पूर्व कल्पना दिली गेली नाही. नोटीस नाही की नुकसान भरपाई दिली नाही. असे असताना त्यांच्या जमिनीवर असलेलं तार कंपाऊंड काढून जेसीबीच्या साह्याने रस्ता काढण्यास सुरुवात केली. हे पाहून अनिल पिंपळे यांची वृध्द आई तेथे पोहोचली. त्यांनी रस्ता काढणाऱ्यांना रोखत आम्हाला आधी नुकसान भरपाई द्या आणि मग खुशाल रस्ता काढा असे ठणकावले. त्यानंतर मात्र संबंधितांनी तेथून पळ काढला, अशी माहिती त्या वृद्ध मातेने दिली.
रस्ता काढण्याची घाई नेमकी कुणाच्या दबावाखाली केली जात आहे, असा सवाल उपस्थित करुन आम्ही संबंधितांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
https://www.facebook.com/367792237038750/posts/pfbid02GrRisB39LJZqCSPbNNgvMu34L2znu75vKf4UEJxBKnwbFt6RMXL7YW6BDRQG961Jl/?mibextid=Nif5oz
एकीकडे धनदांडग्यांनी उरमोडीच्या पात्रात बेसुमार बेकायदेशीर बांधकामे करुन अतिक्रमण केले त्यांच्यावर कारवाई करायला संबंधित कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या महिला अधिकाऱ्यांना वेळ नाही मात्र ज्या शेतकऱ्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्यांना मोबदला मिळाला नाही म्हणून रस्ता करु देत नाही म्हणून पोलिस फौजफाटा सोबत घेऊन कंपाऊंड काढणाऱ्या त्या महिला अधिकारी परिसरातील झालेली अतिक्रमणे काढण्याची धमक दाखवणारं का ? असा संतप्त उलट सवाल परिसरातील शेतकरी करत आहेत.