१७ पासून साताऱ्यात ‘शिवजयंती महोत्सव 2023’
सातारा (महेश पवार) :
शिवजयंती उत्सव समिती राजधानी सातारा यांच्या वतीने शिवजयंती निमित्त शिवजयंती महोत्सव 2023चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली
ते पुढे म्हणाले शिवजयंती महोत्सव निमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते नऊ श्रीमंत छत्रपती प्रताप हायस्कूल येथे ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शनिवार दिनांक 18 रोजी किल्ले अजिंक्यतारा येथे सायंकाळी पाच वाजता गड पूजन व श्री मंगळादेवी आरती व मशाल महोत्सव हे कार्यक्रम होणार आहेत 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त शहरातून राजवाडा सातारा येथून भव्य शाही मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 20 फेब्रुवारी रोजी वारकरी संत तुकाराम महाराज यांच्या अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे गांधी मैदानावर राजवाडा येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तसेच सुंदर देखावे व मिरवणूक स्पर्धा होणार असून प्रथम बक्षीस पंचवीस हजार द्वितीय बक्षीस पंधरा हजार व तिसरे बक्षीस सात हजार रुपये ठेवण्यात आले आहे
सर्व शिवप्रेमी सातारकरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले यावेळी नगरविकास आघाडीचे पक्षप्रमुख अमोल मोहिते जयवंत भोसले इत्यादी यावेळी उपस्थित होते