google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर

कराड (प्रतिनिधी) :

राज्याचा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. या अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त निधीची तरतूद मतदारसंघातील गावासाठी व्हावी यासाठी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण प्रयत्नशील असतात.

मतदारसंघातील गावांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काही महत्वाची कामे अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित यादीमधून मंजूर झाली आहेत. यानुसार १६ कोटी ५० लाख इतक्या रकमेची कामे मंजूर झाली आहेत.

या कामामध्ये कराड ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-५५ कि.मी. ७/२०० ते ८/२०० मधील रस्त्यासाठी उर्वरित लांबीतील क्षेत्राचे भूसंपादन करणे यासाठी ७ कोटी रु., डिचोली, नवजा, हेळवाक, मोरगिरी, साजूर, तांबवे, विंग हॉटेल, वाठार, रेठरे, शेणोली स्टेशन रा.मा. १४८ कि. मी. ८५/०० ते ८६/५०० रस्त्याची सुधारणा करणे यासाठी १ कोटी ५० लाख रु., आटके टप्पा ते आटके, जाधवमळा, रेठरे बु. व्हाया डंगरे वस्ती, पवारमळा, खुबी रस्ता प्रजिमा-७७ कि.मी. ०/०० ते ६/०० (भाग-आटके टप्पा ते रेठरे बु.) रुंदीकरण व मजबुतीकरणासह सुधारणा करणे यासाठी ५ कोटी रु., कालेटेक, काले, संजयनगर, कालवडे, नांदगाव, साळशिरंबे, पाचुम्बरी रस्ता प्रजिमा-७३ कि.मी. ०/०० ते ५/०० (भाग-कालेटेक ते कालवडे) ची सुधारणा करणे यासाठी २ कोटी रु., कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर रस्त्यावर कि.मी. ४/६०० दरम्यान प्रजिमा ६९ पार्ले गावाजवळील पुलासाठी संरक्षणभिंतीचे बांधकाम करणे व पार्ले गावासाठी जोड रस्ता करणे यासाठी १ कोटी रु. अशी एकूण १६ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली असून या कामांमधून मंजूर गावातील कामे केली जाणार आहेत.


पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे लोकप्रतिनिधी असल्यापासून त्यांनी प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयांची कामे आजपर्यंत केली आहेत. आता आणखी १६ कोटी ५० लाख रुपयांची कामे मंजूर झाल्याने मतदारसंघातील जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!