google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

सोसायटी, बँक खात्याचा परस्पर गैरवापर करून शेतकऱ्याला केले कर्जबाजारी?

सातारा (महेश पवार) :

जावली तालुक्यातील सोनगाव येथील नारायण शामराव शिंदे हे सोनगाव वि.का.स सेवा सोसायटीचे सभासद असून त्यांच्या नावे २०१७ साली २५५५० इतके कर्ज थकीत होते त्या नंतर त्यांनी सोसायटीचे कोणतेही कर्ज घेतले नाही अथवा कोणत्याही कर्जाची मागणी केली नाही . २०१७ साली शिंदे यांनी घेतलेले कर्ज घराच्या आर्थिक परिस्थिती मूळे २०१९ पर्यंत थकीत होते , शिंदे यांना २०१९ साली देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीत आपलं कर्ज माफ झाले असे वाटत होते मात्र ते झाले नाही.

कर्ज घेतल्यानंतर २०१७ नंतर शिंदे यांना सोसायटीचे कोणत्याही प्रकारचे कर्जाचे नोटीस आले नाही. मात्र २०२१ साली १०१चा दावा दाखल करण्यापूर्वीचे ९४५००/- रु चे नोटीस सोसायटी सचिव सुनील महामुलकर, चेरमन- नारायण खाशाबा शिंदे यांनी पोष्टाने पाठवले.

कर्ज माफ झाले असताना मला एवढ्या मोठ्या रकमेची नोटीस कशी आली म्हणून मी विरोध केला , अन या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना असे लक्षात आले की सोसायटी सचिव,चेरमन आणि संचालक मंडळ यांनी संगनमताने माझ्या सोसायटी आणि बँक खात्याचा गैरवापर करून परस्पर २०१८ आणि २०१९ साली माझ्या एकाही शेतात जलसिंचनाची कोणतीही सोय नसताना कागदपत्री माझ्या नांवे ऊस कर्ज काढून वापरले असल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी विरोध केला.

यानंतर तब्बल ८ महिन्यानंतर मला बोलावून कर्ज कमी करतो पण तेवढे कर्ज तुम्हाला भरावेच लागेल असे दमदाटीच्या शब्दात सांगून २०१७ साली शिंदे यांनी घेतलेले कर्ज २५५५०/- रु आणि त्याचे फेब्रुवारी२०२२ पर्यंतचे व्याज असे मिळून ४८४८०/- रु एवढ्या रकमेचे नोटीस शिंदे यांना दिली असल्याचे सांगितले.

शिंदे यांच्या फसवणूक प्रकरणातील मुद्दे :

१). २०१६ साली घेतलेले थकीत कर्ज ( रक्कम २५५५०३) २०१९ च्या जीआर नुसार २लाखाच्या आतील कर्ज म्हणून माफ का नाही झाले?

२) शिंदे यांचे आत्ताचे वय 82 वर्ष आहे,माझे शिक्षण जास्त झाले नाही. माझी सही साधी सरळ आहे म्हणून माझी सही स्वतः करून सचिव सुनील महामुलकर यांनी सहीचा का गैरवापर केला?

३). २०१६ च्या कर्जाची नोटीस २०१७ ला एकवेळ दिली नंतर २०१८, २०१९, २०२० साली न देता थेट २०२१ सालीच का देण्यात आली?

४). २०१६चे कर्ज भरले नसताना माझ्या नावे २०१८, २०१९ साली कर्ज कसे मंजूर झाले ?

५) संबंधित २०२१ साली आलेल्या नोटीस प्रमाणे ९४५००रु कर्जाची चौकशी करून विरोध केला असता ९४५००रु ची नोटीस बदलून तब्बल महिन्या नंतर कर्ज वाढण्या ऐवजी कमी करून ४८४८०/- रु ची नोटीस का दिले ?

६) परस्पर बैंक खात्याचा २०१७ पासून आता पर्यत का गैरवापर केला गेला

असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे यांनी केला आहे.

शिंदे यांच्या जिल्हा बॅंकेतील भरण्यात आलेल्या चलनावर वेगवेगळ्या सह्या तसेच खाडाखोड सुध्दा दिसून येते , तसेच काही चलणावर शाखा प्रमुखांच्या सह्या नाहीत तर काही चलनावर सविस्तर खाते नंबर टाकला नसल्याचे दिसून येते.

शिंदे यांनी सोसायटी आणि बँक खात्याचा परस्पर गैरवापर करून कर्जबाजारी केल्याचा आरोपांबाबत सोसायटी चे सचिव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं काही ही घडले नसून नियमानुसार कर्ज वाटप केले असल्याचा दावा केला असून या सर्व प्रकाराबाबत जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!