![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/09/ani_20220316084_0_jpg_1648444618.jpg)
‘मुख्यमंत्र्यांनी महिला आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करावा’
पणजी :
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तीन महिला आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करून महिलांना ‘सन्मान’ देण्यास भाजप कटिबद्ध असल्याचे सिद्ध करावे, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
“ ह्या प्रक्रियेसाठी कोणतीही जनगणना किंवा डीलिमिटेशन करण्याची आवश्यकता नाही. त्यावर मुख्यमंत्री स्वता निर्णय घेऊ शकतात आणि मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करू शकतात,” असे चोडणकर म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार ‘महिला आरक्षणा’च्या मार्फत महिलांना ‘सन्मान’ देत असून गोवा विधानसभेत महिलांसाठी १३ जागा राखीव ठेवणार असल्याच्या प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चोडणकर यांनी त्यांना प्रश्न केला की, असे असल्यास एकही महिला त्यांच्या मंत्रिमंडळात का नाही?
“गोवा विधानसभेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. निवडून आलेल्या तीन महिला आमदारांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. जेव्हा ते महिलांना ‘सन्मान’ देण्याचे मोठमोठे दावे करतात तेव्हा त्यांना मंत्रीपद देण्याचाही विचार केला पाहिजे. गेल्या दोन वर्षांत त्यांना ‘सन्मान’ देण्यात अपयश का आले,” असे चोडणकर म्हणाले.
“जर भाजप आणि प्रमोद सावंत महिलांना राजकीय स्थान देण्यास बांधील असतील तर गोव्यातील महिला आमदारांना गोव्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यापासू वंचित का ठेवले जात आहे. त्यांनी महिला आरक्षणावरून लोकांची फसवणूक करणे थांबवावे. अदानी प्रकरण आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अपयशावरून लक्ष हटवण्याचा हा आणखी एक जुमला आहे,” असे चोडणकर म्हणाले.
“अनेकदा प्रमोद सावंत ‘गोवा हे पहिले राज्य आहे’ असा दावा करत असतात. ते नंतर ‘हर घर जल’ असो किंवा उघड्यावर शौचमुक्ती योजना सुरू करण्याचा दावा असो. अशा खोट्या घोशणा केल्यानंतर लोकांनी त्यांच्यावर टिकाही केल्या आहेत. पण आता त्यांना महिलांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून गोवा विधानसभेतील ३३ टक्के महिलांना ‘सन्मान’ देणारे पहिले राज्य बनण्याची उत्तम संधी मिळाली आहे. आशा आहे की सावंत ते करेल आणि सिद्ध करेल की त्यांना खरोखरच महिलांना ‘सन्मान’ द्यायचा आहे,” असे चोडणकर म्हणाले.
‘भाजपकडे महिला आमदार असूनही ‘महिला व बालविकास’ खाते पुरुष आमदारांकडे आहे. मला आशा आहे की भाजप महिला मोर्चा देखील माझ्या मागणीला पाठिंबा देईल आणि त्यांच्या नेत्यांपर्यंत हे पोहोचवेल जेणेकरून महिलांना त्यांचे हक्क मिळतील,” असे चोडणकर म्हणाले.
“मला आशा आहे की मुख्यमंत्री प्रमोद सावंत महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी होईपर्यंत थांबणार नाहीत आणि आपला शब्द पाळून महिला आमदारांना ‘सन्मान’ देतील,” असे ते म्हणाले.