वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सध्या देशात एकूण 34 हायस्पीड वंदे भारत ट्रेन धावत आहेत. 2019 मध्ये पहिल्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय होत आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेने सप्टेंबरसाठी यादी जाहीर केली आहे. कोणत्या मार्गावरील वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद आहे, तर कोणत्या मार्गावर कमी प्रतिसाद आहे, हे सांगितले जाते. त्यानुसार गोवा-मुंबई आणि शिर्डी मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मात्र कमी प्रतिसाद असल्याचे यातून समोर आले आहे.
वंदे भारत ट्रेनची संख्या सतत वाढत आहे. त्यात आता मध्य रेल्वेने कोणत्या मार्गावर कोणत्या ट्रेनला किती ऑक्युपन्सी मिळाली, हे सांगितले आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस (20825) मध्ये सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 122.71 टक्के ऑक्युपन्सी होती. तथापि, या परतीच्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस (20826) ट्रेनला 99.14 टक्के ऑक्युपन्सी होती.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर एक्स्प्रेस (22225) ची ऑक्युपन्सी होती 108.63 टक्के. तर उलट सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (22226) या ट्रेनची ऑक्युपन्सी होती 101.47 टक्के.
छत्रपती शिवाजी टर्मिनस-गोवा एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस-शिर्डी एक्स्प्रेस या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे.
गोवा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (22230) या वंदे भारत ट्रेनला 90.02 टक्के ऑक्युपन्सी लाभली आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा (22229) या वंदे भारत ट्रेनला सप्टेंबरमध्ये 98.46 टक्के ऑक्युपन्सी मिळाली आहे.