गंभीर आजारांवर मात करणाऱ्या वीरांसह ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा
पणजी :
जिथे भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा होत असताना, ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. तिथेच भारतातील आयुर्वेदिक कार्डिअॅक हेल्थकेअर क्लिनिकची आघाडीची शृंखला असलेल्या माधवबागने हृदयरोग सारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांपासूनचा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे.
डॉ. रोहित साने यांच्या नेतृत्वाखाली, माधवबागने भारतातील सात राज्यांमधील 270 हून अधिक क्लिनिक्समध्ये ‘मी एक विजेता’ कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात डॉक्टरांसह हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांवर मात करून आनंदी जीवन जगत रुग्णांचाही समावेश होता.
या समारोहात सुमारे 2,000 रुग्ण उपस्थित होते जिथे त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल सुवर्णपदक देण्यात आले. या सर्व व्यक्तींना माधवबागच्या वैज्ञानिक व संशोधनावर आधारित उपचारांचा फायदा झाला आहे व गेल्या ३-४ महिन्यांत त्यांना त्यांच्या आजारांपासून पूर्णपणे मुक्ती मिळाली असे रुग्णांच्या व्यक्तव्यातून समोर आले.
या कार्यक्रमाचा प्राथमिक उद्देश हा या विजयी व्यक्तींना निरोगी जीवनशैली सुरू ठेवण्यासाठी प्रेरित करणे हा होता. त्याचबरोबर आधुनिक जीवनशैलीशी निगडित अनेक आजार यशस्वीपणे बरे होऊ शकतात, हा एक संदेशही माधवबागला समाजाला द्यायचा होता.
जीवनशैलीतील काही आजारांमध्ये आजीवन औषधे घेणे हाच एकमेव पर्याय आहे, असा सर्वसाधारण समज आहे. माधवबागने या संकल्पनेत पूर्ण बदल करून ही संकल्पना मोडीत काढली आहे. तसच या समारोहा दरम्यान, माधवबागचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोहित साने असं ही म्हणाले की, आम्ही 10 लाखांहून अधिक रुग्णांमधील हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांवर वैज्ञानिक व संशोधनावर आधारित आयुर्वेदिक पद्धतीद्वारे यशस्वी उपचार केले आहेत. “आम्ही तोंडी औषधोपचार, जीवनशैली आणि आहारातील बदलांसह एक्सरसाईजच्या मदतीने सर्जरीसाठी ओळखल्या जाणार्या हृदयविकारांवर देखील विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले आहेत.