का जप्त केली ईडीने ‘त्या’ तिघांची 11.82 कोटींची मालमत्ता जप्त?
Land Grabbing Case in Goa ED: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोव्यातील बेकायदेशीर जमीन बळकावण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तिघांविरोधात कारवाई केली आहे. ईडीने एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या 11.82 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.
ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत मालमत्ता जप्त केल्या आहेत.
आरोपींनी जमीन बेकायदेशीरपणे संपादन करण्याच्या उद्देशाने मालमत्तेचा मालक कोणत्याही कायदेशीर वारसांशिवाय मरण पावला आहे किंवा कायदेशीर वारस भारताबाहेर वास्तव्य करत आहे, अशा मालमत्ता शोधून काढल्या.
वर्णनाशी सुसंगत मालमत्ता सापडल्यानंतर, आरोपींनी मालमत्तेच्या मूळ मालकाची फसवणूक करून त्यांच्या नावे विक्री करार किंवा पॉवर ऑफ अॅटर्नी करून या मालमत्तांचा ताबा घेतला, असे तपासातून समोर आले आहे.