पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. मोदी या दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार असून, मडगाव येथील जाहीर सभेला ते संबोधित देखील करतील. पंतप्रधान मोदींच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर गोवा शिक्षण संचालनालयाच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सहा फेब्रुवारी रोजी मडगावमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मोदींचा दौरा आणि मडगावमध्ये होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत व्हावी किंवा त्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शाळा बंद ठेण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण संचालनालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मडगावातील सभेला किमान 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना मोदींची होणारी ही सभा राजकीय नसल्याचा उल्लेख देखील सावंत यांनी केला आहे.