पणजी :
मोदींची गॅरेंटी म्हणजे ‘जुमला’ असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस अतुल लोंढे पाटील यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन न पाळल्याने तरुणांची फसवणूक केली आहे.
काँग्रेस हावस-पणजी येथे पत्रकार परिषदेत अतुल लोढे पाटील बोलत होते. यावेळी एआयसीसीचे राष्ट्रीय प्रवक्ते विजय इंदर सिंगला, एआयसीसी गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, जीपीसीसी अध्यक्ष अमित पाटकर, युवा कॉंग्रेसच्या प्रभारी रिची भार्गव आणि विरियटो फर्नांडिस उपस्थित होते.
“अग्निवीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य किंवा पेन्शनच्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत, ज्या नियमित सेवा करणाऱ्यांना मिळतात. नरेंद्र मोदींनी अग्निवीरांचा विश्वासघात केला आहे,” असे ते म्हणाले.
“कठोर निवड प्रक्रिया पार केल्यानंतर 2019 ते 2022 दरम्यान नियमित भरती मोहिमेमध्ये भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या 3 गौरवशाली सशस्त्र सेवांमध्ये स्वीकारल्या गेलेल्या 1.5 लाख तरुण आणि महिला इच्छुकांना भरती नाकारण्यात आली, कारण मोदी सरकारने सशस्त्र दलांवर अचानक अग्निपथ योजना लादली. या तरुणांनी भारताच्या राष्ट्रपतींची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना भेटण्यापासून रोखण्यात आले. मोदींनी त्यांना अशीच वागणूक दिली हे ठीक नाही,” असे पाटील म्हणाले.
यासाठी ‘जय जवान: अन्याय के विरुध्द न्याय का युद्ध’ ही मोहीम राहुल गांधींनी सुरू केली आहे असे ते म्हणाले .
ते म्हणाले की, या मोहिमेद्वारे ते अग्निपथ योजना सुरू करताना 1.5 तरुण-तरुणींकडून क्रूरपणे हिसकावून घेतलेल्या नोकऱ्या परत कराव्यात आणि सशस्त्र दलांसाठी पूर्वीची भरती प्रणाली पुन्हा सुरू करावी अशी मागणी करत आहेत.
पाटील म्हणाले की, 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत ‘संपर्क’ अभियानाच्या माध्यमातून 30 लाख कुटुंबांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत.
ते म्हणाले, “5 ते 10 मार्च या कालावधीत जास्तीत जास्त तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी आणि त्यांना चालू असलेल्या मोहिमेची जाणीव करून देण्यासाठी सत्याग्रह सुरू केला जाईल.”
17 ते 20 मार्च या कालावधीत होणाऱ्या न्याय यात्रेच्या (पदयात्रा) माध्यमातून ते सर्व जिल्ह्यांमध्ये 50 किलोमीटरपर्यंत चालत लोकांशी संपर्क साधतील, असेही ते म्हणाले.