google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

‘साताऱ्याचा उमेदवार ‘कोण’ ते २८ रोजी आम्ही सांगणार’

सातारा (महेश पवार) :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची आज बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साताऱ्याच्या उमेदवारी संदर्भात दोन-तीन वेळा प्रश्न विचारताच अजित पवारांचा सूर वरच्या पटीत गेला, ते म्हणाले,  मला गंमत कळत नाहीये, २८ तारखेला महायुतीतर्फे आम्ही तिन्ही नेते प्रेस घेवून तुम्हांला सांगणार आहे,  तरी तुम्ही मला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारताय.

पत्रकाराने पुन्हा साताऱ्याच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर अजितदादा म्हणाले, अरे बाबा दम काढ ना, २८ तारखेला जाहीर होईल ना. पण, उदयनराजे दम काढत नसल्याचे पत्रकार म्हणाला. त्यावर त्यांना भारतीय जनता पार्टीचे नेते समजावून सांगण्याचं काम करतील, असे अजितदादांनी स्पष्ट केले. आमच्या कार्यकर्त्यांचं पूर्णपणे समाधान होईल अशा पद्धतीने आम्ही जागा मागितलेले आहेत असेही त्यांनी सांगितलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!