google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘भविष्यातील काणकोणकरांच्या पिढ्यांना आपत्तीपासून वाचवा’

काणकोण :

भविष्यात जन्माला येणाऱ्या काणकोणकरांना  आपत्तीपासून वाचवणे आता काणकोणकरांच्याच हातात आहे. मी काणकोणकरांना  नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी लोलयें  येथील पर्यावरण-संवेदनशील भगवती पठारावरील फिल्मसिटी प्रकल्पासाठी संमती देऊ नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.


काँग्रेस पक्षाचे इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा, काणकोण गट काँग्रेसचे अध्यक्ष आबेल बोर्जेस आदींच्या उपस्थितीत काणकोण येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.


आता मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) अखत्यारीत असलेल्या 105 किलोमीटरच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या गोमंतकीय पारंपारीक व्यावसायीकांना लवकरच अडचणींचा सामना करावा लागेल. एमपीएच्या अखत्यारीतून संपूर्ण किनारपट्टी मुक्त करण्यासाठी आणि गोमंतकीयांना दिलासा देण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. काणकोणातील मच्छीमार समुदाय तसेच किनारपट्टी भागात राहणाऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे, असे  कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगीतले.


रिअल इस्टेट माफियांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने भाजप सरकार गोव्यातील प्रत्येक इंच जमिनीवर डोळा ठेवत आहे. काणकोणकरांनी सत्तरी येथील शेळ मेळावलीतील शेतकऱ्यांसारखाच उत्साह दाखवून फिल्मसिटी प्रकल्पाला विरोध करावा. ही प्रचंड जमीन तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी राहू द्या, असे केपेंचे  आमदार एल्टन डिकोस्टा म्हणाले.


दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रत्येक काणकोणकरांपर्यंत पोहोचून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना मतदान करण्याची विनंती करण्याचे आवाहन केले.


काणकोण गट काँग्रेसचे अध्यक्ष आबेल बोर्जेस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना बहूमत मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असे ठाम आश्वासन दिले.


या बैठकीला काणकोण महानगरपालिका क्षेत्रातील तसेच पैंगीण, आगोंदा, श्रीस्थळ, गावडोंगरी या पंचायत क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी दक्षिण गोवा लोकसभा जागा जिंकण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!