‘हा’ संघ ठरला अॅड. अरुण सिंगबाळ प्रस्नमाची स्पर्धेचा विजेता
अकराव्या अॅड. अरुण सिंगबाळ प्रस्नमाची स्पर्धेत गोवा विद्यापीठाच्या लक्षिता नायक व श्रेयस गांवकार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. धेंपे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोंकणी भाशा मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत एकूण 36 संघ सहभागी
झाले होते.
जीव्हीएम्स डॉ. दादा वैद्य शिक्षण महाविद्यालयाच्या निलिन गुरुदास नायक व आकृती अशोक नायक यांनी द्वितीय तर धेंपे महाविद्यालयाच्या झनायदा ब्रागांझा व झिनिया ब्रागांझा यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. धेंपे महाविद्यालयाच्या तोर्शन भट्टाचार्य व
ऋषिकेश कलघटकर यांनी चौथे पारितोषिक पटकावले.
स्पर्धेच्या समारोप समारंभाला गोवन वार्ता वृत्तपत्राचे संपादक पांडुरंग गांवकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोकणी भाशा मंडळाची ही प्रस्नमंजुषा स्पर्धा आज गोव्यात एक मॉडेल स्पर्धा बनली आहे. ही स्पर्धा जीपीएससी तसेच इतर परीक्षां साठी युवकांची
तयारी करू शकते. स्पर्धेत विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देणे मलाही कठीण असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
कोंकणी भाशा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ, स्पर्धेच्या पुरस्कर्त्या अॅड. दीपा सिंगबाळ, धेंपे महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. वृंदा बोरकर व स्पर्धेचे समन्वयक श्वेतांग नायक या वेळी उपस्थित होते. धेंपे महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका अंजू साखरदांडे
यांनी आभार मानले.
कक्षम नायक, उर्वशी नायक, देविका रेडकार, डॉ. श्रावणी नायक, श्रद्धा शिरोडकार, श्वेतांग नायक, सुरज कामत, अमेय गोवेकार, मोहित सुखठणकार आणि अनुराग वेर्डेकार यांनी प्रश्नमंजुषेचेशे क्वीज लॅब तर्फे यशस्वी आयोजन केले. दिव्या कलंगुटकर हिणे उद्घाटन व
समारोप समारंभाचे सुत्रसंचालन केले.