google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

ॲक्सिस बँकेतर्फे स्पर्श सप्ताह २०२४ लाँच

ॲक्सिस बँक या भारताच्या खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एका बँकेने ग्राहकांबरोबरचे आपले नाते अधिक बळकट करण्यासाठी ‘स्पर्श सप्ताह २०२४’ या ग्राहकाभिमुख उपक्रमाची दुसरी आवृत्ती लाँच केली आहे. ५ ते ९ ऑगस्टदरम्यान सुरू होत असलेल्या या सप्ताहात बँकेतर्फे आपले कर्मचारी आणि ग्राहकांसाठी ग्राहकाभिमुख उपक्रमांची मालिका आयोजित केली जाणार आहे. हे उपक्रम ‘डिलायटिंग कस्टमर्स, एव्हरी डे’ या बँकेच्या तत्त्वाचे पालन करणारे आणि बँक व उपकंपन्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी हे तत्त्व सातत्यपूर्ण प्रक्रियेच्या रूपात अंगीकारणारे असतील.

स्पर्शच्या ‘लिसन, ऍक्ट, सेलिब्रेट’ या प्रमुख विचारसरणीशी सुसंगत राहात बँकेतर्फे विविध उपक्रमांची मालिका आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये मास्टरक्लासेस, फायरसाइड चॅट्स, ग्राहक आणि नेतृत्व कनेक्ट, परिसंवाद यांचा समावेश असून, त्यामध्ये वक्ते त्यांचे अमूल्य ज्ञान व अनुभव कर्मचाऱ्यांपुढे मांडतील आणि ग्राहक समाधानाचे तत्त्व रुजविण्यास मदत करतील. या उपक्रमाचा एक भाग म्हणून बँकेद्वारे आपल्या ५,००० पेक्षा जास्त शाखांद्वारे स्पर्श सप्ताह ग्राहकांबरोबर साजरा करण्यासाठी खास ऑफर्स उपलब्ध केल्या जाणार आहेत.

  • ३० लाख आरोग्य विमा (कुटुंब योजना), २,४९९ रुपयांचे वार्षिक प्रीमियम्स
  • मोफत ॲक्सिस डायरेक्ट अकाउंट, स्मार्ट एड्ज ॲक्सिस,वर्षात* ७२ टक्के परतावे देणारे स्टॉक्स
  • वाहन कर्जासाठी इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत १०० टक्क्यांपर्यंत ऑनरोड फंडिंग, अंदाजे ५० बीपीएसने कमी व्याजदर
  • शिक्षणासाठी १०० टक्के कर्ज, राहण्याच्या खर्चासह अर्थसाहाय्य, व्हिसापूर्व वितरण सुविधा आणि प्रवेशपूर्व मंजुरी पत्र
  • फास्ट फॉर्वर्ड आणि शुभ आरंभ गृहकर्जांसाठी (२० लाखांपेक्षा जास्त गृहकर्जासाठी) १२ ईएमआय* सवलत
  • क्रेडिट कार्ड ऑफर्स आणि ग्रॅब डील्स, ईझी डिनर व ट्रॅव्हल एड्ज सवलत
  • प्रेस्टिज आणि संपन्न खात्यासाठी २५० रुपयांचे अमेझॉन व्हाउचर

 

या लाँचविषयी ॲक्सिस बँकचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह विजय मुलबागल म्हणाले, ‘आनंदी ग्राहक बँकिंगविषयक त्यांच्या सर्व गरजा बँकेकडे आणतात आणि मित्रपरिवार व कुटुंबाला शिफारस करतात. स्पर्श २.० अशा ग्राहकांना महत्त्व देणारे असून, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांच्याप्रती कळकळ दर्शविणे, इनपुट मेट्रिक्सवर लक्ष केंद्रित करण्यातून ग्राहकांना आनंद देणाऱ्या क्षणांची निर्मिती करणे व पर्यायाने ग्राहकांना १०/१० प्रमोटर्स बननिणे. स्पर्श सप्ताहात या मूल्यांवर लक्ष केंद्रित करणारे बरेच उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याशिवाय या आठवड्यात ग्राहकांसाठी खास ऑफर्सही देण्यात येणार आहेत.’

या वर्षी बँक विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांशी थेट संवाद साधणार आहे. हे उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत –

 

  • निवडक शाखांमध्ये ग्राहकांसह मीट अँड ग्रीट
  • ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल बँकिंगचा परिचय करून देणे
  • टेस्ट ड्राइव्हचे आयोजन करणे व निवडक शहरांत वाहन कर्ज उपलब्ध करून देणे
  • संभाव्य ग्राहकांशी ‘समारोह’ या ग्राहककेंद्रित उपक्रमाच्या माध्यमातून नाते जोडणे व बँकेची उत्पादन, तसेच सेवांविषयी जागरूकता निर्माण करणे
  • मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या व समूहांतील ग्राहकांचा सत्कार करणे

स्पर्शच्या गेल्या तीन वर्षांतील विविध उपक्रमांमुळे बँकेचा नेट प्रमोटर स्कोअर वाढण्यास मोठी मदत झाली आहे. गेल्या दोन वर्षांत रिटेल बँकेच्या एनपीएस स्कोअरमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे कंतार सर्वेक्षणानुसार ॲक्सिस बँकेला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!