ढाक्यात भीषण स्फोट; ११ ठार, शेकडो जखमी
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका इमारतीत स्फोट झाल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार, या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
ढाका येथील गजबजलेल्या बाजारपेठेत मंगळवारी हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट का झाला, त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आज दुपारी 4.50 च्या सुमारास हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याचे निरीक्षक बच्चू मिया यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतांश जखमींवर हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरु आहेत. ज्या इमारतीत स्फोट झाला त्या इमारतीच्या तळमजल्यावर सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने आहेत. त्याच्या शेजारी ब्रॅक बँकेची शाखाही आहे. स्फोटामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.