
स्टार प्लसवर लवकरच येणार ‘चाशनी’
स्टार प्लसने नेहमीच आपल्या उत्कृष्ट शोजसह दर्शकांचे मनोरंजन केले आहे. असे म्हणणे योग्य ठरेल की, स्टार प्लसच्या सर्व शोजने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला असून, दर्शकांनी शोमधील पात्रांवर प्रेम केले आहे, तसेच, त्यांचे इमोशन्सही अनुभवले आहेत. मग तो स्टार प्लसचा जुना शो ‘कहानी घर घर की’ असो ज्याने आजही लोकांच्या मनात आपली जागा बनवली आहे, किंवा आजच्या काळात चॅनलवर प्रसारित होणारे कार्यक्रम ‘अनुपमा’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘तेरी मेरी डोरियां’, ‘इमली’, ‘ये है चाहतें’, ‘रज्जो’ आणि ‘फालतू’ असो, हे शोज सर्वांचे मनोरंजन करत आहे.
अशातच आता, स्टार प्लस भारतीय टेलिव्हिजनवर ‘चाशनी’ नावाचा आतापर्यंतचा सर्वात मसालेदार आणि मनोरंजक शो आणण्यासाठी सज्ज आहे. स्क्रीनवर नातेसंबंधांचे एक मिश्रण सादर करणारा हा शो, चांदनी आणि रोशनी या दोन बहिणींमधील असामान्य बंधनावर आधारित असेल. स्टार प्लस या नवीन शोद्वारा एक नवी पातळी गाठत , एक अशी कथा ज्यामध्ये दोन बहिणी नंतर सासू आणि सून बनतात अशा मसालेदार कंटेंटसह दर्शकांचे मनोरंजन करेल. अशातच, अनेक ट्विस्ट्स आणि टर्न्सने भरपूर असलेला स्टार प्लसचा ‘चाशनी’हा नवीन शो टेलिव्हिजनवर याआधी कधीही न पाहिलेली एक नवीन स्टोरी लाइन प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज आहे.
स्टार प्लसचा ‘चाशनी’या शोची निर्मिती संदीप सिकंद यांच्या सोल प्रॉडक्शनद्वारा होत असून, यामध्ये अमनदीप सिद्धू आणि सृष्टी सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.