google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

मुलांच्या आत्महत्या : एक चिंतनीय प्रश्न

  • अंकुश शिंगाडे
मुलांचा बौद्धिक विकास खुंटविण्याला जबाबदार घटक भरपूर आहेत. ज्यात शिक्षक, संस्थाचालक, सरकार आणि पालकांचा समावेश आहे. शिक्षक यासाठी जबाबदार की तो शिकवतो. त्याचा थेट संबंध विद्यार्थ्यांशी येतो. ते जर चांगले शिकविणारे असले वा त्यांचं त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलं समजत असेल तर तो विद्यार्थी शत प्रतिशत बौद्धिक ज्ञान हस्तगत करु शकतो आणि शिक्षकांचं शिकवणं जरी चांगलं असेल आणि ते त्या विद्यार्थ्यांना अजिबात समजत नसेल तर त्याच्यातील बौद्धिक ज्ञानाची खिल्ली उडत असते. त्यातच त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे समजत नसेल तर त्याला शिक्षणाबद्दल असुया वाटायला लागते व तो बौद्धिक दृष्टीनं शिक्षणातून मागे पडतो. कधीकधी तो शाळेतच जात नाही.
दुसरा महत्वाचा घटक असतो शाळा संस्थाचालक. हा संस्थाचालक शाळेतील शिक्षकांना त्रास देत असतो. म्हणतो की त्यानं विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करुन द्यावे. त्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना त्रास देत असतो. ज्यातून विद्यार्थी आत्महत्याही करीत असतात. असाच एक प्रकार उत्तरप्रदेशात जौनपूर येथे घडला. उत्तरप्रदेशमधील प्रतापगढ जिल्ह्यात इयत्ता नववीत शिकणाऱ्या रिया प्रजापती नावाच्या मुलीने आत्महत्या केली. त्याचं कारण होतं शाळेतील शुल्क. ते तिला जबरदस्तीनं भरायला लावल्याने व ते पैसे तिच्याजवळ नसल्याने व तिच्यात शिक्षणाची आस असल्याने तिला अपमान वाटला. त्यातच आपल्याजवळ पैसे नसल्याने परीक्षेपासून वंचीत ठेवल्याचा अपमान तिला होणं साहजीकच होतं.
आमची शिक्षणनीती अलिकडील काळातील अशीच आहे. अशीच याचा अर्थ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची आत्महत्या करणारी. आमच्याकडे असणारी बौद्धिक क्षमतेला खतपाणी घालणारी रणनीती. त्या रणनीतीचे प्याधे अर्थात शिक्षक हे संस्थाचालकाला घाबरतात. गुलामागत वागतात. त्यांना नोकरी गमावण्याची भीती असते. अशा संस्थाचालकाच्या मनात ना शिक्षकांच्या वेतनाबद्दल दया असते, ना विद्यार्थ्यांतील शिक्षणाबद्दल आत्मीयता असते. त्याला फक्त जवळचा असतो पैसा. पैसा हाच त्यांचा नातेवाईक असतो आणि पैसा हाच त्यांचा सर्वस्व. शिवाय दुसरे नातेवाईक असतात त्याचे नातलग. हे नातेवाईक व तो, असे दोघेही घटक मिळून बाहेरील आलेल्या इतर शिक्षकांसमोर पैशासाठी तकादा लावत असतात. त्यांचं मानसिक खच्चीकरण करीत असतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास असे शिक्षक कितीही ज्ञानवंत असले तरी त्यांच्या ज्ञानवंतपणाची संस्थाचालक हत्या करीत असतात. हे प्रकर्षाने आढळून येते.
संस्थाचालक असा व्यक्ती असतो की त्याला शिक्षकांकडून पैसा न मिळाल्यास तो आगबबूला होतो. पैसा हा संस्थाचालकाला प्रिय असल्यानं नमस्कार त्यातच त्याचा जीव असल्यानं तो आगबबूला होणारच. मग ती विद्यार्थ्यांची फी का असेना, तो न मिळाल्यानं असा संस्थाचालक त्याच्या शाळेत असलेल्या शिक्षकांना आदेश देतो, ‘आपण आम्हाला विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करुन द्या. नाहीतर नोकरी सोडून घरी बसा.’ असे शब्द असतात संस्थाचालकाचे. त्यानंतर तो शिक्षक विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी तकादा लावतो तो म्हणतो, ‘परिक्षेचे पैसे द्या. नाहीतर मी तुम्हाला परिक्षेलाच बसू देणार नाही.’ ते शिक्षकांचं विद्यार्थ्यांना रोजचं बोलणं. त्यावर ते विद्यार्थी हिरमुसल्या तोंडानं घरी जातात. आपल्या मायबापाला त्यांचं बोलणं असतं, ‘पप्पा, परिक्षेचे पैसे भरायचेय. शाळेचं विद्यावेतन शुल्क भरायचंय. ते दिल्याशिवाय मला परिक्षेला बसता येणार नाही.’
हे सर्व बोलणं. संस्थाचालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं. एका शाळेच्या संस्थाचालकामुळं प्रताडीत होणारी यंत्रणा. त्या संस्थाचालकामुळं विद्यार्थी, शिक्षक व पुढं पालकही प्रताडीत होतात. मग आत्महत्या घडतात. उत्तरप्रदेशमधील रिया प्रजापतीची घडली तशी. कारण पालकवर्गाकडे सर्व दिवस सारखे नसतात. कधी त्यांच्या जीवनात पैशाचा वसंत असतो वा पाऊस असतो तर कधी शिशिर अर्थात उन्हाळा. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ. मुलांना त्याची कल्पना असतेच. ती मुलं हुशार असतातच. परंतु पर्याय नसतो शेवटी. अशातच एकवेळ अशी येते की शिक्षणाची अतीव इच्छा असणारी मुलं एकतर पैशाअभावी शिक्षण सोडतात. दररोजचं शिक्षकांचं बोलणं ऐकावं लागू नये म्हणून. ते दोष देतात शिक्षकांना. कारण त्यांचा थेट संबंध शिक्षकांशीच येतो. त्यांना माहीत नसतं की त्या शिक्षकांच्या वरतीही एक त्यांना पैसे मागायला लावणारा घटक बसला आहे. ज्याला संस्थाचालक म्हणतात. तोच पैसे मागत आहे.
महत्वाचं म्हणजे जो विद्यार्थी आपल्या पालकाला पैसे मागतो. अशा पालकांनी पैसे न दिल्यास तो विद्यार्थी जर हुशार असेल तर तो निश्चीतच आपली आत्महत्या करुन मोकळा होतो. अन् त्याच विद्यार्थ्यांचा बाप जर हुशार असेल, परंतु पैशाअभावी हतबल असेल तर तो तरी आत्महत्या करतो. हे झालं आत्महत्येचं. एक उदाहरण असं आहे की सरकारी अनुदान असलेल्या शाळेत नवव्या वर्गात परीक्षेचे पंचावन रुपये मागत असलेले परिक्षा शुल्क विद्यार्थ्यांजवळ नसल्यानं विद्यार्थ्यानं शाळा सोडलेल्या आहेत. असा एक विद्यार्थी नाही तर असे बरेच विद्यार्थी आहेत.
मुलांचा बौद्धिक विकास. आता तर सरकारनं नव्यानं अध्ययन निष्पत्त्या आणल्या. त्यांच्या मनानुसार सर्व तळागाळातील विद्यार्थी, किमान पहिली ते पाचवीतील विद्यार्थी हे त्या त्या इय्यतेतील अध्ययन निष्पत्ती पार करायलाच हवेत. त्यासाठी त्यांनी शिक्षकांना धारेवर धरले आहे व नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचे गट पाडले आहेत. वर्ग तिसरीत विद्यार्थ्यांना वाचन व लेखन यायलाच हवं असं त्यांचं म्हणणं आहे. हे विद्यार्थी दृष्टीनं अतिशय चांगली बाब आहे. परंतु यात सत्य गोष्ट अशी की शिक्षक प्रसंगी चांगलाच शिकवेल, शिकवतोही. ही सत्य बाब आहे. परंतु त्यावर पाळत ठेवणारा घटक, जो मुख्याध्यापक असतो. तो संस्थाचालकाचा नातेवाईक असतो व त्या संस्थाचालकाला पैसा प्यारा असतो. तो पैशासाठी कोणत्याही स्तराला जातो. अशावेळेस शिक्षक जरी चांगला शिकवत असेल, तरी त्याच्या ब्रेक लागतं. ज्यातून इयत्ता तिसरीच्या मुलांना वाचन आणि लेखन येवू शकत नाही. एक असाच मुख्याध्यापक होवून गेला की ज्यानं शिक्षकांवर पैसे कमविण्यासाठी आरोप लावलेत. त्याला विद्यार्थ्यांचे पेपर घेवू दिले नाही. ते दुसऱ्याच नात्यातील असलेल्या शिक्षकांकडून घेतले व आरोप लावले की त्यानं पेपरच घेतलेले नाहीत.
विशेष सांगायचं झाल्यास विद्यार्थी हा शिक्षक, संस्थाचालक व सरकार यांच्या मधात फसलेला असतो. त्यातून तो निघू शकत नाही व त्यात त्याला आत्महत्या करावी लागते. शिक्षणाची अशी जर दुर्दशा असेल तर राबविण्यात येत असलेले, ठरलेले, ठरविलेले शैक्षणिक धोरण कुचकामाचे ठरते. ज्यातून शिक्षणाची असलेली वा ठरलेली उद्दिष्ट यशस्वी होत नाहीत. हे तेवढंच खरं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!