आगीच्या घटनांबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
CM pramod sawant :मोर्ले, सत्तरी येथील जंगलात सातत्याने लागत असलेल्या आगींबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज, मंगळवारी रात्री 10 वाजता ही बैठक होणार आहे. मोर्ले-सत्तरी येथील कम्युनिटी हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.
या बैठकीत या जंगल परिसरातील आग, वणव्यांवर नियंत्रण आणि उपाययोजनांची चर्चा होऊन ठोस कार्यक्रम ठरू शकतो. या बैठकीला राज्याचे वन मंत्री विश्वजीत राणे, राज्य आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी, वन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या आगीच्या घटनांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. दोषी सापडले नाहीत तर वन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांकडून कळते.