पोर्तुगीज पासपोर्ट प्रश्नाला चालना मिळण्याची शक्यता
याच विषयासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी विदेश व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्याकडे चर्चा केली होती. या विषयाबाबत महत्वाची माहिती समोर येतेय.
पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद केल्यामुळे भारतीय पासपोर्ट मागे न घेता तो जमा करून घेतल्याचे प्रमाणपत्र दिले जावे, ही मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहेत.
पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद केल्यामुळे नूतनीकरणावेळी भारतीय पासपोर्ट मागे घेतले जाण्याच्या घटना अलीकडे घडू लागल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने तसा निर्णय घेतला आहे.
असा पासपोर्ट मागे घेतल्यामुळे या गोमंतकीयांना अनिवासी भारतीय ओळखपत्रासाठी अर्ज करता येत नाही की, त्यांना पोर्तुगीज पासपोर्टही घेता येत नाही.
पोर्तुगालमध्ये जन्म नोंद केलेल्या गोमंतकीयांच्या मुलांना भारतीय पासपोर्टही देणे नाकारले जात आहे.
अशा समस्यांनी ग्रस्त गोमंतकीयांसोबत आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात संवाद साधला. त्या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री शहा यांच्यासोबत उद्या होणाऱ्या बैठकीत हा विषय उपस्थित करू, असे आश्वासन दिले.
https://youtu.be/qBQGzneuBpw