
उत्कृष्ट डिझाइनसह एआय पॉवर्ड साइड-बाय-साइड गोदरेज रेफ्रिजरेटर्स लाँच
घरगुती उपकरणे आता फक्त गरजेच्या वस्तू राहिलेल्या नाहीत, तर त्या स्टाइल आणि स्मार्ट लिव्हिंगचं प्रतीक बनत आहेत. ग्राहकांचाही प्रीमियम, जास्त क्षमता असलेल्या, तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्ये आणि पर्यायाने जास्त सोयीस्करपणा देणाऱ्या उत्पादनांकडे ओढा वाढत आहे. ग्राहकांच्या पसंतीशी सुसंगत राहाण्यासाठी गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपचा भाग असलेल्या गोदरेज अँड बॉइस या अप्लायन्सेस बिझनेसने एआय पॉवर्ड वेलवेट साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्स लाँच केले आहेत. या रेफ्रिजरेटर्समध्ये सौंदर्य व तंत्रज्ञान यांचा अनोखा मेळ घालण्यात आला आहे.
या एआय पॉवर्ड ६०० लीटर्सची मोठी क्षमता असलेल्या रेफ्रिजरेटरमध्ये कुलिंगचा योग्य प्रकारे वापर केला जातो. खाद्यपदार्थांचे प्रमाण आणि कितीवेळा दरवाजा उघडला जातो या गोष्टी लक्षात घेऊन त्यात उर्जेचाही गरजेनुसार वापर केला जातो. त्याशिवाय तापमानावर ऑटोमॅटिक नियंत्रण राखण्यासाठी इको मोडसारखा इंटेलिजंट मोड, तर वेगवान कुलिंगसाठी सुपर फ्रीज मोड यात देण्यात आले आहेत. हा भारतीय बनावटीचा रेफ्रिजरेटर ग्राहकांच्या स्टोअरजेच्या सतत बदलत असलेल्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार बदल करतो व ग्राहकांची चांगली सोय होते. यामध्ये स्मार्ट कनव्हर्टिबल झोन देण्यात आला असून त्यात -3°C ते 5°C तापमान राखले जाते व गरजेनुसार फ्रीझर, चिलर किंवा पँट्री सेक्शनप्रमाणे वापर करता येतो.
आधुनिक इन्व्हर्टर कंप्रेसरमुळे फ्रीजचे कामकाज जास्त कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि आवाज करता केले जाते. दारावर स्लीक, डिजिटल पॅनेलसह इतर बऱ्याच सोयीसुविधा या फ्रीजमध्ये देण्यात आल्या आहेत. ऑपेरा रोज आणि ऑपेरा ब्लॅक अशा दोन अभिजात रंगांत उपलब्ध करण्यात आलेले हे रेफ्रिजरेटर्स खऱ्या अर्थाने किचनचं सौंदर्य आणि रोजच्या जगण्यातला सोयीस्करपणा वाढवतील.
गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या रेफ्रिजरेटर्स अप्लायन्सेस बिझनसेचे प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव म्हणाले, ‘आजच्या ग्राहकांना उच्च दर्जाची किचन उपकरणे हवी असतात. ही उत्पादने दर्जेदार कामगिरी करणारी व स्मार्ट वैशिष्ट्यांसह आपल्या जीवनशैलीला साजेशी असावीत अशी त्यांची अपेक्षा असते. गोदरेजच्या अद्ययावत एआय- पॉवर्ड इयॉन वेलवेट साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्सची श्रेणी भारतीय स्वयंपाकघरांचे सौंदर्य वाढवतील. नवीन लाँच आणि वेगवेगळ्या क्षमतांच्या रेफ्रिजरेटर्स श्रेणीसह आम्ही या उन्हाळ्यात रेफ्रिजरेटर्स क्षेत्रात २५ ते ३० टक्के वाढीचे लक्ष्य ठेवले आहे.’