‘…तर पाकिस्तानचे तीन तुकडे करतील हिंदुस्तानी’
इस्लामाबाद:
जर पाकिस्तानी सैन्याने (Pakistan Army) योग्य निर्णय घेतला नाही, तर पाकिस्तानचे तीन तुकडे (three parts)होतील, असा इशारा माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)यांनी दिला आहे.
भारतातील थिंक टँक हा इतर देशांच्या मदतीने पाकिस्तानातील बलुचिस्तानची फाळणी करण्याची योजना आखत असल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे. भारतातील थिक टँककडे याबाबतची योजना तयार आहे, त्यासाठी पाकिस्तानातील जनतेला इशारा देत असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान सध्या आत्महत्येच्या वाटेवर आहे, जर योग्य निर्णय झाले नाहीत, तर पहिला बळी सैन्यदलाचा जाईल, अशी शक्यताही इम्रान यांनी वर्तवली आहे. युक्रेनप्रमाणे पकिस्तानची अण्वस्त्रही जातील अशी भीतीही त्यांनी वर्तवली आहे.
इम्रान खान यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान समोरच्या धोक्यांची यादीच वाचून दाखवली आहे. आर्थिक पातळीवर देशाचे नाव दोषींच्या यादीत जाण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे.
ही पाकिस्तान आणि सैन्यासमोरची मुख्य समस्या आहे. जर या स्थितीत सैन्याने योग्य निर्णय घेतला नाही तर ते नष्ट होतील, सर्वात आधी सैन्याचा बळी जाईल, हे लिहून देण्यास तयार असल्याचे इम्रान म्हणाले. ज्यावेळी देशाचे मोठे नुकसान झालेले असेल त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला अण्वस्त्रांचा त्याग करण्याचे सांगण्यात येईल. १९९० साली हेच युक्रेनमध्ये घडले होते, याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे.