बाळासाहेब पाटील यांचे ‘कराड-उत्तर’तील ग्रामपंचायतीवर वर्चस्व
कराड (अभयकुमार देशमुख) :
कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील एकूण ४९ ग्रामपंचायतीच्या सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार बाळासाहेब पांडुरंग पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या ११ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत.
मतदान झालेल्या उर्वरित ३८ ग्रामपंचायती मध्ये लोकनियुक्त सरपंच व सदस्यांसह आमदार बाळासाहेब पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ ग्रामपंचायतींवर बहुमताने विजय संपादन करुन निर्विवाद वर्चस्व निर्माण केले.
नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे आमदार बाळासाहेब पांडुरंग पाटील यांनी भ्रमणध्वनीव्दारे अभिनंदन केले व मतदार बंधू भगिनींचे आभार मानले.
कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील कराड तालुक्यातील २० पैकी १३ सातारा तालुक्यातील १० पैकी ७ कोरेगांव तालुक्यातील ७ पैकी ५ खटाव तालुक्यातील ६ पैकी ४ आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील ६ पैकी ४ अशा एकूण ४९ पैकी ३३ ग्रामपंचायतींवर मान. आमदार श्री. बाळासाहेब पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घवघवीत यश संपादन केले.