वृक्षतोड आणि अवैद्य उत्खनन करून भरतोय कास महोत्सव ?
सातारा:
कास पठारावर वृक्षतोड आणि अवैध्य उत्खनन करून भरतोय कास महोत्सव ? कास पठारावर ज्या ठिकाणी कास महोत्सवासाठी मंडप उभारला जातोय त्या ठिकाणी असणारी शेकडो झाडं कोणाच्या परवानगीने तोडली आणि उत्खनन केले ? यासंबंधी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता यासंबंधी माहिती घेऊन नंतर सविस्तर माहिती देऊ असे सांगितले.
कास पठारावर वन विभाग तसेच जिल्हा माहिती कार्यालय यांच्या मार्फत आयोजित केलेल्या कास महोत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा करण्याचा डाव नेमका कोणाचा ? एकीकडे कास परिसरात वन्यजीवांच्या मार्फत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना जी शासनामार्फत मदत दिली जाते ती पोहोचत नाहीये मात्र कास पठाराच्या महोत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी नेमकी कोणासाठी ? आणि कशासाठी?हाच प्रश्न सर्वसामान्य सातारकर करत आहे.
या संबधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता अद्याप या कार्यक्रमांची जबाबदारी नेमकी कोणाची ठरलं नाही ? तर पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकारी करमकर यांनी देखील या कार्यक्रमाच्या खर्चा संबधी अद्याप कोणतीही तरतूद झालेली नसुन , हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होत असल्याची माहिती करमकर यांनी दिली.
कासच्या पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या निधी वरुन आणी अतिक्रमण कामावरून राजकारणाला खरी सुरुवात झाल्याचे चित्र दिसत येत आहे? कास मोहोत्सवासाठी उभारण्यात येत असलेल्या मंडपाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असणारी शेकडो झाडांची वृक्षतोड व सपाटीकरण केले गेले त्यावर कोणतीही कारवाई का केली नाही ? कास मोहत्सवाचे संपूर्ण कार्यक्रमाचे काम हे कोणाच्या कार्यकर्त्यांचे खिसे भरण्यासाठी दिले ?असा सवाल सातारकर उपस्थित करत आहेत ?
कासच्या इको सेन्सिटिव्ह झोन आणि रिजर्व फॉरेस्ट च्या परिसरात चला हवा येऊ द्या फेम आणि लाईव्ह कॉन्सर्ट करून स्थानिकांना काय फायदा ? पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असे कार्यक्रम घेऊन नेमके काय साध्य करायचे ? यामुळे कास च्या पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेली उधळपट्टी थांबणार का ?