‘…तेव्हा प्रशासकीय अधिकारी झोपा काढत होते का?’
सातारा (महेश पवार):
वर्ल्ड हेरिटेज दर्जा असलेल्या कास पठारावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे तयार होत असलेल्या सिमेंटच्या जंगल तयार होतानाचे चित्र , हे कास पुष्प पठाराला लागलेली किड लागल्यासारखे आहे . ऐवढी भली मोठी बांधकामे उभी राहताना आणि सगळे नियम फाट्यावर मारत बेकायदेशीर हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारली जात असताना रोखले असते तर कास पठारांचे सौंदर्य अबाधित राहिले असते , यामुळे या धनदांडग्यांना पाठिशी घालणार्या अधिकारी वर्गावर कारवाई का केली गेली नाही पाहिजे ?असा सवाल निसर्ग प्रेमी करत आहेत.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री विजय बापू शिवतारे यांनी कास पठारावर बांधकाम करण्यास मनाई असल्याचा फलक लावले होते त्यानंतर महसूल विभाग आणि वन विभाग यांनी कारवाई करून सुध्दा कास पुष्प पठारावर सिमेंटचे जंगल वाढत कसं गेलं यांचा शोध घेणं आवश्यक आहे . खरंतर प्रशासनाला हाताशी धरून धनदांडग्यांनी आणि राजकीय व्यक्ती नी कास पठार भकास करण्याचा डाव आखला आहे . यामुळे भविष्यात कास पठार वाचविण्यासाठी आणि वर्ल्ड हेरिटेज दर्जा टिकवून ठेवण्यासाठी निसर्ग प्रेमींनी एकत्र येऊन या धनदांडग्यांना पाठिशी घालणार्या वन विभाग आणि महसूल विभागाच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली पाहिजे.
कास पठारावर स्थानिक भूमिपुत्रांनी खरं तर आपल्या जमिनी धनदांडग्यांच्या घश्यात घालण्यापेक्षा स्वतः परवानगी घेऊन स्वतः व्यवसाय उभे करण्याची गरज . असताना धनदांडग्यांनी कवडी मोल भावात जमिनी घेत स्थानिकांच्या पोटावर पाय आणला . पोटावर पाय आणणारे दुसरे तिसरे कोण नसून काही बड्या नेत्यांचे बगलबच्चे असल्याने तोंड दाबून बुक्यांचा मार येथील स्थानिकांना सोसावा लागतो . तर कारवाया झाल्या तर स्थानिकावर आणि ज्याची कुठं ओळख नाही अश्या लोकांवर करुन चालणार नाही सरसकट बेकायदेशीर हॉटेल्स आणि रिसॉर्ट वर कारवाई होणे गरजेचे आहे , जे की कास पठारावर गेले दोन दिवस झाले महसूल विभागाच्या गाड्यांच्या ताफ्यात कागदोपत्री कारवाई करताना आणि रोड शो करतानाचे चित्र दिसत आहे.