google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

किरण कांदोळकरांसह कार्यकर्त्यांचा राजीनामा

पणजी :
गोवा तृणमूल काँग्रेसचे प्रमुख किरण कांदोळकर यांच्या पत्नी कविता कांदोळकर यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आपण आपल्या समर्थकांच्या परवानगीने राजीनामा देत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. कविता कांदोळकर यांनी नुकतीच गोवा विधानसभा निवडणूक थिवी मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर लढवली होती, त्यांचे पती किरण कांदोळकर यांनी हळदोणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्यावर तृणमूल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. किरण कांदोळकर यांच्यासह लिओ डायस, संदीप वझरकर, तारक आरोलकर कार्यकर्त्यांसमवेत पक्षाचा राजीनामा देणार असल्याची त्यांनी आज पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.

कविता कांदोळकरच्या या हालचालीमुळे टीएमसीला गोवा राज्य समितीची पुनर्रचना करणार असल्याची घोषणा करण्याची संधी मिळाली. पत्रकारांशी बोलताना कविता कांदोळकर म्हणाल्या की, माझ्या समर्थकांकडून टीएमसी सोडण्याचा दबाव होता, अनेक दिवस या दबावाला विरोध केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

टीएमसीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘लवकरच गोवा राज्य समितीची पुनर्रचना केली जाईल. या निमित्ताने गोव्यातील लोकांच्या भल्यासाठी काम करण्याच्या आमच्या गांभीर्याचा पुनरुच्चार करूया. खरे तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने एमजीपीसोबत एकत्र निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दुसरीकडे, 40 सदस्यांच्या सभागृहात 20 जागा जिंकणाऱ्या भाजपने एमजीपीचे दोन आमदार आणि तीन अपक्षांच्या पाठिंब्याने सत्तेत पुनरागमन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!