google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

भारतातल्या सर्वात मोठ्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

ISRO ही भारताची एक राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे. इस्रोने गेल्या काही वर्षांत अनेक यश संपादन केले आहे. आजसुद्धा इस्रोने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोने आज LVM3-M3 रॉकेटचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण केले आहे. याद्वारे एकाच वेळी ३६ उपग्रहांचे अवकाशामध्ये स्थापित करण्यात आले आहे. आज सकाळी ९ वाजता हे यशस्वी प्रक्षेपण पार पडले.

अधिकृत माहितीनुसार, ४३ मीटर उंची असणाऱ्या इस्रोच्या रॉकेटने ३६ उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केले. LVM3 ने ज्या उपग्रहांसह उड्डाण केले त्यांचे एकूण वजन ५ हजार ८०५ टन आहे. या मोहिमेला LVM3-M3/OneWeb India-2 असे नाव देण्यात आले आहे. इस्रोने ट्विट करून या मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली .

नेटवर्क अ‍ॅक्सेस असोसिएट्स लिमिटेड युनायटेड किंगडम (वनवेब ग्रुप कंपनी) ने लो-अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेडसह एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. २३ ऑक्टोबर २०२२ मध्ये इस्रोने OneWebचे ३६ उपग्रह प्रक्षेपित केले. भारतातील भारती एंटरप्रायझेस OneWeb मध्ये प्रमुख गुंतवणूकदार आणि भागधारक म्हणून काम करते.

LVM3 चे हे सहावे उड्डाण आहे जे पूर्वी जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल MkIII (GSLVMkIII) म्हणून ओळखले जात होते. चांद्रयान-2 सह याने सलग पाच मोहिमा केल्या होत्या असे इस्रोने सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!