”लंपी’पासून गाईच्या संरक्षणासाठी सरसकट लसीकरण करा’
जिल्ह्यामध्ये लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: माण खटाव भागामध्ये गाईंच्या रक्षणासाठी लस पुरवठा मोठ्या प्रमाणात व्हावा तसेच सरसकट सर्व जणावरांचे लसीकरण झाले पाहिजे अशी भूमीका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली आहे. याबातचे निवेदन शिवसेना कोरेगाव माण विधानसभा जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांनी आपल्या पदाधिकार्यासमवेत सातारा जिल्हाधिकारी यांना दिले, यावेळी सातारा जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री नाही हि दुर्देवी बाब असल्याची माहिती यांनी दिली.
निवासी जिल्हाधिकार्याना लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शिवसेनेचे माण कोरेगाव विधानसभा जिल्हा प्रमुख प्रताप जाधव हे निवेदन देण्यासाठी आले असता , रखडले ले पालकमंत्री पद शंभुराजे देसाई कडे असल्याचे जाहीर केल्याने प्रताप जाधव यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर विशेषत: पालकमंत्री यांना लक्ष घालायला सांगा म्हणत चिमटा काढला.