
पाटणच्या मालदन बंधाऱ्याच्या पायाजवळचे निसटले दगड…
पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष... मालदनकरांचा आंदोलनाचा इशारा
सातारा (महेश पवार) :
पाटण तालुक्यातील मालधन गावाजवळ वांग नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पायाजवळचे दगड निसटल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला असतानाही संबंधित विभागाची यंत्रणा याकडे गांभीर्याने बघत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत बंधारा फुटण्याची भीती असल्याने आणि तेथील नदीपात्रात लोकांची वरदळ येजा असल्याने तातडीने आवश्यक उपाययोजना करणं गरजेचं आहे, दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
मालदन बंधाऱ्यात महिंद धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा साठा होतो या पाणी साठ्याची व्याप्ती मोठी आहे बंधाऱ्यात उन्हाळ्यातही पाणी तुडुंब भरलेले असते दरम्यान गेल्या काही दिवसांपासून येथील बंधाऱ्याच्या पायाजवळचे दगड निसटले असून बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे सध्या मराठवाडी धरणातून विसर्ग थांबवल्याने बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी होऊन पायाजवळचा तुटलेला भाग उघडा पडला आहे यामुळे बंधारा फुटण्याच्या भितीने शेतकरी व नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत . याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना हाती न घेतल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान या प्रश्न पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याबाबत संबंधित विभागाला सूचना कराव्यात अशी मागणी उपसरपंच ज्योतिराज काळे यांनी केले आहे .