महात्मा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारासाठी आवाहन
कराड (अभयकुमार देशमुख) :
परिवर्तन प्रतिष्ठान कराड ही संस्था सन- 2008 सालापासून समाजहिताचे कार्य करत असून त्या मध्ये सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य विषयक मेळावे आदी कार्यक्रम राबवत असते,तसेच समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफ़त गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असते.
सन- 2019 साली सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या पाण्याने थैमान घातले अनेक कुटुंबे बेघर झाली ,हायवे बंद असल्याने हजारो ट्रक हायवेवर ठीक ठिकाणी अडकले , यावेळी पाचवड फाटा ता. कराड या ठिकाणी अडकलेल्या पाचशे ट्रक ड्रायव्हर , क्लिनर याना संस्थेच्या वतीने चपाती व भाजीचे वाटप करणेत आले , समाजाचे आपणही काहीतरी देने लागतो आहे हे डोळ्यासमोर ठेऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण- आप्पासाहेब गायकवाड यांनी पूरग्रस्तां साठी पाच हजार रुपयाची देणगी पुढारी च्या रिलीफ फंडासाठी दिली ,तसेच कोराणाचे महामारी च्या काळात शिवभोजन चे माध्यमातून गरिबांचे झोपडी पर्यंत जेवणाचे वाटप केले.
गेल्या वर्षी सन – 2021 साली संस्थेच्या वतीने 25 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण स्मृति सदन कराड या ठिकाणी जेष्ट पत्रकार डॉ.विजयकुमार नीलावर हिंगोली , समाजसेविका – माया कांबळे लातूर , समाजसेविका – ज्योती अदाटे सांगली , समाजसेवक -दादासाहेब ननावरे बीड, आदर्श शिक्षक हसंमिया रिफाई रत्नागिरी,समाजसेवक -सचिन होळकर नाशिक,मोटार वाहन निरीक्षक-प्रकाश खटावकर सातारा , समाजसेविका – वैष्णवी गुरव कोल्हापूर,आदर्श शिक्षक- प्रशांत वायदंडे, आदर्श पोलीस पाटील -हरिभाऊ थोरात पुणे, आदर्श पत्रकार- दत्ता जंगम कराड आदींना गौरवण्यात आले आहे.
या वर्षीचा सहावा पुरस्कार सोहळा असून संस्थेचे कार्य जोमात सुर आहे या वर्षीही महात्मा फुले यांचे स्मृती दिना चे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अधिकारी, समाजसेवक, याना राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श पुरस्कार 2022 दि. 4 डिसेंबर 2022 रोजी स.11-30 वा. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड जि. सातारा या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते गौरवनेत येणार आहे.
सदर पुरस्कारासाठी इच्छुकांनी आपण केलेल्या उल्लखनीय कार्याचा प्रस्ताव प्रत्यक्ष अथवा पोस्टाने संस्थेच्या पत्त्यावर शॉप नं 1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, आंबेडकर चौक कराड, जि.सातारा पिन 415110 ,या ठिकाणी दि.15/11/2022 अखेर पाठवावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, सचिव – बुद्धभूषण गायकवाड, सल्लागार तहसिलदार बी.एम.गायकवाड साहेब,राजेंद्र रंगराव माने, प्रमोद काशीद सर, विद्या मोरे मॅडम , प्रवीण सरवदे , आनंदराव सवाखंडे,यांनी केले. प्रस्ताव सोबत चारित्र्य पडाळणी दाखला जोडणे आवश्यक आहे.