महावितरणचा घोटाळा उघड करणाऱ्या कर्मचाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न?
सातारा :
जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या कामगारांच्या पगारातून कपात करुन घोटाळा केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून जिल्हा पोलीसांकडे तक्रारी आल्या नंतर गुन्हा दाखल करण्यात आला , यानंतर या तक्रारी मध्ये कोळसे पाटील या महावितरणच्या कर्मचाऱ्यांला का तक्रार केली म्हणून या आधी देखील फोन वरून त्या कर्मच्यार्यास जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, याप्रकरणी सातारा जिल्हा पोलिस प्रमुखांना भेटून जिवितास धोका असल्याची माहिती दिली होती, यामुळे या प्रकरणी जिल्हा पोलिस आता काय भूमिका घेणार व काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले असून या कर्मचाऱ्यांच्या मध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या मधून होत आहे .