google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘भारत जोडो यात्रेने द्वेष दूर केला…’

पणजी:

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सोबत लाखो लोकांनी कन्याकुमारी ते काश्‍मीरपर्यंत ‘ भारत जोडो यात्रे’ त सहभागी होवून, देशातून द्वेष काडून टाकण्यासाठी प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश दिला आणि आमचा देश विविधतेचा आदर करतो हे दाखवून दिले. मात्र या बिगर राजकीय यात्रेने वैफल्यग्रस्त झालेला भारतीय जनता पक्ष काही जुने मुद्दे उपस्थित करुन जातीय तणाव निर्माण करण्यात व्यस्त झाला असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी म्हटले.

भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मडगाव येथील लोहिया मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.

भाजप सरकार भूतकाळातील मृतप्रश्न मांडत आहे आणि सांप्रदायिक भावना भडकावत आहे. हे सरकार या गोष्टीत एवढे व्यस्त आहे की त्याला राज्यातील ज्वलंत प्रश्न गंभीर समस्या सोडवण्यासाठीही वेळ नाही असे आलेमाव म्हणाले.

भाजप सरकाराच्या अपयशांवर टिकास्त्र सोडताना युरी आलेमाव यांनी या सरकारने चुकीच्या धोरणांमुळे जंगलांचा नाश कसा केला आणि कायदा सुव्यवस्था बिघडवणारे वातावरण कसे तयार केले यावर भाष्य केले. “गोवा सर्वांसाठी असुरक्षित झाला आहे. विशेषतः महिलासाठीही. आमच्या राज्यात पर्यटक येतात आणि यासाठी आम्ही सर्वांना सुरक्षित वातावरण दिले पाहिजे. मात्र त्यात या सरकारला अपयश आले आहे. सध्या कित्येक गुन्हे घडत असताना दिसत आहे आणि यासाठी राज्याबाहेर चुकीचा संदेश जाणार आहे,” असे ते म्हणाले.


भाजप सरकार लोकांच्या विरोधात काम करत असून, लोकांना नको असतानाही राज्यात कोळसा केंद्र तयार करण्यावर जोर देत आहे असे ते म्हणाले.


ते म्हणाले की भाजपचे मंत्री प्रत्येक संधीचा वापर करून गोव्यातील जमीन बाहेरच्या लोकांना विकत आहेत. ” विकासाच्या नावाखाली इथे नगर नियोजन कायद्यात दुरुस्ती केली जात आहे आणि या माध्यामातून ऑर्चर्ड जमीन रूपांतरीत केली जात आहे. प्रत्येकक्षेत्रात भाजप सरकार लूट करीत आहे आणि गोवा नश्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे.


गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ आणि इतर माध्यामातून राज्यातील जमीन नश्ट करण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचे ते म्हणाले.


ऱाज्यातील लोक म्हादई वाचवण्यासाठी आंदोलने करत असताना, भाजप सरकार प्रत्येक गोष्ट कर्नाटक राज्याला कशी चांगली पडेल या नजरेतून करत असल्याचा आरोप त्यांनी केला.


उच्च न्यायालयाने म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचा आदेश देवूनही, भाजप सरकार लोकांच्या विरोधात जाउन या आदेशाला आव्हान देण्याचे कटकारस्थान करत आहे असे युरी आलेमाव म्हणाले.


गोव्यातील वनजमिनीवर माफियांचा डोळा आहे असेही ते म्हणाले. म्हादई संदर्भात लोकांच्या बिरोधात जाऊन सरकार कोट्यावधी रुपये वकिलांवर खर्च करत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस आघाडीच्या ‘ इंडिया’ स्थापनेमुळे भाजप गोंधळून गेला आहे असे ते म्हणाले.


आता भारत हे नाव आणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. हा त्यांचापूर्णपणे बालिशपणा आहे असे ते म्हणाले.

“भारत जोडो, भारत जीतो; भारत जुडेगा तो ही इंडिया जितेगा ” असा नारा त्यांनी यावेळी दिला.

युरी पुढे म्हणाले की ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही अलीकडची चर्चा भारतीयांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. “नरेंद्र मोदींच्या अदानी आणि अंबानींच्या संबंधां कडून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.


युरी पुढे म्हणाले की सध्याच्या प्रक्रियेनुसार निवडणूका घेतल्या तर भाजपचा पराभव होइल हे त्यांना ठावूक आहे आणि यासाठी ही रणनीती त्यांनी सुरु केली आहे असे ते म्हणाले.

गोव्यातील विरोधी पक्षनेता म्हणून मी एकता निर्माण करण्यासाठी
कोणतीही कसर सोडणार नाही . विरोधकांच्या एकजुटीसाठी आवश्यक तेव्हा त्याग करण्याची माझी तयारी आहे. हल्लीच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांना प्रश्न मांडण्यासाठी योग्य वेळ उपलब्ध करून दिली आहे असे ते म्हणाले.

भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!