google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

”म्हणून’ निलेश काब्राल यांनी मागावी गोमंतकीयांची माफी’


कुडचडे :

तीनवेळा आमदार आणि दोन वेळा मंत्री असलेले नीलेश काब्राल हे स्वतःच्या जबाबदाऱ्यांबद्दल अनभिज्ञ असल्याचे विवीध माध्यमांच्या व्हिडीयोवरुन दिसून येते. विधीमंडळ कामकाज मंत्री निलेश काब्राल यांनी काँग्रेस आमदारांना विधानसभेच्या निकषांवर प्रवचने देणे थांबवावे आणि भाजप सरकारने लोकशाहीच्या केलेल्या हत्येबद्दल गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणी कुडचडे गट काँग्रेसचे अध्यक्ष पराग सबनीस यांनी केली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि इतर दोन कॉंग्रेस आमदारांनी “नवीन आमदारांचा” टॅग वापरू नये, या विधीमंडळ कामकाज मंत्री नीलेश काब्राल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कुडचडे गट कॉंग्रेस अध्यक्ष म्हणाले की, दोन वेळा मंत्री होऊनही नीलेश काब्राल यांना अद्याप आपल्या खात्यांच्या जबाबदारीची माहिती नाही. त्यांनी स्वतःची कर्तव्ये नीट समजून घ्यावीत असा टोला पराग सबनीस यांनी हाणला आहे.

सार्वजनीक बांधकाम मंत्री आणि पर्यावरण खात्यांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे हे उघड आहे. याचा परिणाम म्हणजे नवीन जुवारी पुलावर कोणत्याही परवानग्याशिवाय वीजेच्या जोडणीसह असलेला फ्रीज, आझाद मैदानाजवळील मधोमध खचलेला रस्ता, किनारपट्टीवरील बेकायदेशीर हॉटेल्सकडून दररोज होणारे आवाजाच्या निर्बंधांचे उल्लंघन असल्याचे पराग सबनीस यांनी नमूद केले.

नीलेश काब्राल यांनी मागील विधानसभा अधिवेशनांच्या कामकाजांचे खंड वाचण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विशेषतः काँग्रेस सरकारच्या काळात सभागृहाच्या कामकाजात विरोधकांना कशाप्रकारे महत्त्व आणि समान संधी दिली गेली हे त्यांना समजेल, असे पराग सबनीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बैठक बोलावल्यानंतर सात विरोधी आमदार एकत्र आल्याने भाजप सरकार हादरले आहे, ही वस्तुस्थिती आहे. भाजप सरकारसाठी हा मोठा धक्का आहे, असे पराग सबनीस यांनी सांगितले.


काँग्रेसचे तिन्ही आमदार आणि पक्ष संघटना एकजूट असून, आमच्या नेत्यांबद्दल कोणतीही खोडसाळ टिप्पणी आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही गोमंतकीयांचा आवाज बनून राहू, असे पराग सबनीस म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!