google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘का’ गायब होत आहेत पाकिस्तानी एअर होस्टेस कॅनडामध्ये?

pakistani air hostess canada : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स ची एक केबिन क्रू मंगळवारी कॅनडामध्ये विमानाने लँडींग केल्यानंतर ड्युटीवर असताना अचानक बेपत्ता झाली. (pakistani air hostess canada) मरियम रझा असे या एअर होस्टेसचे नाव आहे. यामुळे विमान तळावर एकच गोंधळ उडाला. मरियम सोमवारी इस्लामाबादहून पीआयए फ्लाइट पीके-782 ने टोरंटोला पोहोचली, पण कराचीला जाणाऱ्या पीके-784 या परतीच्या फ्लाइटमध्ये ड्युटीसाठी रिपोर्ट केला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मरियमची हॉटेलची खोली उघडली तेव्हा त्यांना तिच्या गणवेशावर ‘धन्यवाद, पीआयए’ लिहिलेली चिठ्ठी सापडली. रझा १५ वर्षांपूर्वी राष्ट्रीय विमान कंपनीत रुजू झाले होती. इस्लामाबादहून टोरंटोला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये त्यांना ड्युटी देण्यात आली होती. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात कॅनडात उतरल्यानंतर क्रू मेंबर बेपत्ता होण्याची ही दुसरी घटना आहे.

देशात प्रवेश केल्यानंतर आश्रय देणाऱ्या कॅनेडियन कायद्यामुळे हा ट्रेंड सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात, एक एअर होस्टेस कॅनडाला पोहोचल्यानंतर परतीच्या फ्लाइटमध्ये चढली नाही तेव्हा अशीच एक घटना नोंदवली होती. गेल्या वर्षी, कॅनडामध्ये फ्लाइट ड्यूटीवर असताना किमान सात PIA केबिन क्रू सदस्य बेपत्ता झाल्या आहेत.

राष्ट्रीय विमान कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी ड्युटीवर असताना फरार झालेल्या क्रू मेंबर्सपैकी एक आता कॅनडामध्ये स्थायिक झाली आहे. (pakistani air hostess canada ) भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पीआयए व्यवस्थापन कॅनडाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असल्याचे त्यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!