google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

मडगावात आपत्ती अटळ : प्रभव नायक

मडगाव :

मडगावकरांच्या सुरक्षेची काळजी घेत, आकें परिसरातील लोकांना धोका निर्माण करणाऱ्या झाडांची छाटणी करण्यासाठी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दुसरे स्मरणपत्र पाठवले. या दिवसात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने आपत्ती निर्माण करणाऱ्या फांद्या पडू शकतात. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास गोवा सरकार जबाबदार असेल, असा इशारा युवा नेते प्रभव  नायक यांनी दिला आहे.


मी 22 जुलै 2024 रोजी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहून आकें  येथे वाढलेल्या झाडांच्या फांद्या लोकांसाठी धोक्याच्या ठरल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून त्या छाटण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी  ताबडतोब 23 जुलै 2024 च्या आदेशानुसार सार्वजनीक बांधकाम खात्याला सदर झाडे कापण्याचेल निर्देश दिले, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.

गेल्या ३ महिन्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर काम हाती घेतले नाही हे धक्कादायक आहे. धोकादायक झाडाच्या  फांद्या छाटल्या तर श्रेय मला जाईल या भीतीने राजकारण खेळले जात आहे, असा दावा प्रभव नायक यांनी केला.

गोव्यात सध्या हवामान खूपच वादळी आहे. दिवाळी सणही अगदी जवळ आला आहे. मला ज्येष्ठ नागरिक, मुले आणि सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी वाटते. मी माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी ही मागणी करत नाही, असे प्रभव नायक म्हणाले.

मला आशा आहे की जिल्हाधिकारी त्वरीत कारवाई करतील, असे न झाल्यास मी जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा पत्र लिहीन आणि माझ्या स्वखर्चाने मजुरांकडून झाडे छाटण्याचे काम करण्यासाठी त्यांची परवानगी घेईन, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.

मी सर्वांना आवाहन करतो की, सार्वजनिक हिताच्या कामांना राजकीय वळण देऊ नका. एखाद्याला काम करता येत नसेल तर दुसऱ्यांना ते करू द्यावे, असे प्रभव नायक म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!