google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

३ पिल्लांसह बिबट्या शिरला गावात…

बोरी:

शिरशिरे – बोरी येथे बिबट्याचे दर्शन झाले आहे. लोकवस्तीत बिबट्या तीन पिलांसह आढळून आला आहे. लोकवस्तीत बिबट्या आढळून आल्याने परिसरात भीती पसरली आहे. आज (दि.26) दुपारी ही घटना उघडकीस आली.

माहितीनुसार, बोरी शिरशिरे येथील लक्ष्मण जोशी यांच्या गोठ्याशेजारी लावलेल्या गवतात बिबट्या तीन पिलासह आढळून आला. याबाबत वनखात्याला माहिती देण्यात आली असून, वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.


दरम्यान, यापूर्वी सावईवेरे-कुळणवाड्यावरील भरवस्तीत 14 मे रोजी बिबट्याचे दर्शन झाले, वीस तास माडावर मुक्काम केल्यानंतर बिबट्या खाली उतरून पसार झाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!