‘अजिंक्यतारा’ची निवडणूक लागणार का ?; शेतकऱ्यांची बाजू घेऊन कोण लढणार ?
सातारा (महेश पवार) :
अजिंक्यतारा कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून बुधवारपासून अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे . ही निवडणूक २१ जागांसाठी होणार असून जवळपास बावीस हजार शेतकरी मतदार आहेत.
खरंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आजवर कारखान्यांची निवडणुक बिनविरोध करत आणली आहे , मात्र या निवडणुकीत अजिंक्यतारा कारखान्यांची निवडणूक लागणार का ? आणि शेतकर्याची बाजू घेऊन कोणी लढणार का ? असा सर्व सामान्य शेतकरी वर्गातून सवाल उपस्थित केला जात आहे.
या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व सामान्य शेतकरी सभासद कुठेतरी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे , शेतकऱ्यांना दहा हजार रुपये चा शेअर्स असुन सुध्दा , काही शेतकरयांना ऊस पेटवून देऊन एकरी दहा हजार देऊन ऊस घालवावा लागला , आणि जावली तालुक्यातील अनेक शेतकर्यांचा शेअर्स नसणार्याचा ऊस पहिला गाळप केल्याने शेतकरी वर्गातून नाराजी असल्याची चर्चा सध्या शेअर्स धारक शेतकरी वर्गात आहे . यामुळे आजपर्यंत बिनविरोध असणा-या अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, खा. उदयनराजे भोसले , शशिकांत शिंदे , दिपक पवार , श्रीनिवास पाटील , ही राजकीय मंडळी इतर निवडणुकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात , मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा पुळका आणणारी ही मंडळी अजिंक्यतारा कारखान्यांच्या निवडणुकीत सहभाग दाखवणार का ?याकडे सर्वसामान्य शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.
अजिंक्यतारा कारखान्यांच्या निवडणूकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दंड थोपटले , शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर ही निवडणूक लढवणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी राष्ट्रमतसोबत बोलताना सांगितले.
अजिंक्यतारा कारखान्यांच्या निवडणूकीसाठी बुधवार पासून अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने का दिली नाही किंवा निवडणूक कार्यक्रम जाहीर का ? केला नाही . नेमकी ही माहिती गुलदस्त्यात का ठेवली गेली असा संतप्त सवाल शेतकरी सभासद करत आहेत .