मेवा शासकीय रुग्णालयाचा आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयांत?
सातारा (महेश पवार)
सातारा जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती पाहता दिवसेंदिवस जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे . मात्र या ठिकाणी काम करणारे डॉक्टर हे जिल्हा शासकीय रुग्णालयात कमी आणि खाजगी रुग्णालयात जास्त वेळ काम करत असल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात उघडकीस आली . दरम्यान संबंधित डॉक्टर माने यांच्यावर जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याची माहिती समोर येत आहे यासंबंधी माहिती घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून ते देखील माहिती मिळू शकली नाही.
खर तर जिल्हा शासकीय रुग्णालयात काही डॉक्टर जिव धोक्यात घालून लोकांना अहोरात्र सेवा देताना दिसतात परंतु , माने डॉक्टरांच्या प्रमाणे शासनाचा मेवा खाऊन सेवा मात्र खाजगी रुग्णालयांत देणाऱ्या डॉक्टरांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना चे चित्र समोर येत आहे .
जिल्हा शासकीय रुग्णालय हे ड्रेनेज लाईन मुळे चर्चेचा विषय बनले आहे , तर या दूसरीकडे सही शिक्का चोरी
यंत्र सामग्री चोरी या सतत च्या विषयामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाची अब्रु ची लक्तरे वेशीवर टांगली असतांनाच जिल्हा शासकीय रुग्णालयाचा मेवा खाऊन सेवा मात्र खाजगी रुग्णालयांत करत असल्याची घटना समोर येवून सुध्दा कारवाई होत नसल्याने , आरोग्य प्रशासन बघ्याची भूमिका का ? घेते हे सर्व प्रकार घडत असताना लोकप्रतिनिधी चे या सर्व गोष्टी कडे का दुर्लक्ष असा प्रश्न उपस्थित होत आहे .